T20 World Cup 2026 Super 8: आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 चा थरार आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. साखळी फेरीतील अटीतटीच्या लढतींनंतर आता 'सुपर 8' टप्प्यासाठी कोणते संघ पात्र ठरले आहेत, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या चारही अशा संघांना स्थान मिळाले आहे, जे साखळी फेरीत एकही सामना हरलेले नाहीत. यामुळे याला 'ग्रुप ऑफ डेथ' म्हटले जात आहे.
सुपर 8 फेरीचे स्वरूप समजून घेणे चाहत्यांसाठी महत्त्वाचे आहे. यामध्ये एकूण 8 टीमची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. स्पर्धेपूर्वीच ठरलेल्या सीडिंगनुसार हे गट निश्चित करण्यात आले होते. म्हणजेच एखादी टीम त्यांच्या ग्रुपमध्ये पहिल्या क्रमांकावर असो किंवा दुसऱ्या, त्याचे सुपर एटमधील स्थान आधीच ठरलेले होते.
साखळी फेरीत चारही संघांची विजयी घोडदौड
भारत (ग्रुप ए): भारतीय संघाने पाकिस्तान, अमेरिका, नेदरलँड्स आणि नामीबिया या सर्व संघांना धूळ चारून 'सुपर 8' मध्ये प्रवेश केला.
झिम्बाब्वे (ग्रुप बी): झिम्बाब्वेने तीन सामन्यात विजय मिळवला, तर त्यांचा एक सामना अनिर्णित राहिला.
वेस्ट इंडिज (ग्रुप सी) व दक्षिण आफ्रिका (ग्रुप डी): या दोन्ही संघांनी आपापल्या गटात सर्वच्या सर्व सामने जिंकून वर्चस्व गाजवले आहे.
'सुपर 8' मधील भारताचे महामुकाबले
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका:* 22 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वा. (अहमदाबाद)
भारत विरुद्ध झिम्बाब्वे:* 26 फेब्रुवारी, संध्याकाळी 7 वा. (चेन्नई)
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज: 1 मार्च, संध्याकाळी 7 वा. (कोलकाता)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world