जाहिरात

T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय, माजी विजेत्यांचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात!

T20 World Cup 2026, AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पहिला धक्कादायक निकाल लागला आहे. झिम्बाब्वेनं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 23 रन्सनं पराभव केला.

T20 World Cup 2026 : झिम्बाब्वेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय, माजी विजेत्यांचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात!
Zimbabwe win against Australia : झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
मुंबई:

T20 World Cup 2026, AUS vs ZIM : टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पहिला धक्कादायक निकाल लागला आहे. झिम्बाब्वेनं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा 23 रन्सनं पराभव केला. कोलंबोमध्ये झालेल्या या मॅचमध्ये झिम्बाब्वेनं दिलेलं 170 रन्सचं आव्हान ऑस्ट्रेलियाला पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 19.3 ओव्हर्समध्ये 146 रन्सवर आऊट झाली.

ऑस्ट्रेलियानं पहिल्या सामन्यात आयर्लंडचा 67 रन्सनं पराभव केला होता. तर झिम्बाब्वेनं ओमानला 8 विकेट्सनं पराभूत केलं होतं. या ग्रुपमधील अन्य टीम असलेल्या यजमान श्रीलंकेनं त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे झिम्बाब्वे विरुद्धच्या पराभवानं ऑस्ट्रेलियाचं स्पर्धेतील आव्हान धोक्यात आलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा अवसानघातकी खेळ

ऑस्ट्रेलियाचा नियमित कॅप्टन मिचेल मार्श या सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत ट्रेव्हिस हेडनं टीमची कॅप्टनसी केली. 170 रन्सचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. त्यांनी पहिल्या पाच ओव्हर्समध्येच चार विकेट्स गमावल्या. 

अनुभवी ग्लेन मॅक्सवेल आणि मॅट रेनशॉ यांनी पाचव्या विकेटसाठी 77 रन्सची पार्टनरशिप करत इनिंग सावरली. पण, ही जोडी फुटल्यानंतर त्यांची इनिंग गडगडली. रेनशॉनं 44 बॉलमध्ये 65 रन्सची खेळी करत एकाकी लढत दिली. पण, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. झिम्बाब्वेकडून ब्लेसिंग मुजरबानीनं 17 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. त्यालाच 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

( नक्की वाचा : T20 WC :कधीकाळी पिझ्झा बनवायचा, आज नेपाळचे स्वप्न चक्काचूर केलं; क्रिकेट विश्वाला हादरवणारा इटलीचा 'हिरो' कोण? )

ब्रेयटची हाफ सेंच्युरी

यापूर्वी झिम्बाब्वेनं पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 2 आऊट 169 रन्स केले होते. झिम्बाब्वेकडून ब्रायन ब्रेनेटनं हाफ सेंच्युरी झळकावली. त्यानं 56 बॉलमध्ये 64 रन्स काढले. तर रायन बर्लनं 30 बॉलमध्ये 34 रन्स केले. कॅप्टन सिंकदर रझानं 13 बॉलमध्ये झटपट 25 रन्स केले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com