बांगलादेशविरुद्धची टेस्ट सीरिज जिंकल्यानंतर T20 सीरिजसाठी टीम इंडिया सज्ज होत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील टीमचा सध्या ग्वाल्हेरमध्ये सराव सुरु आहे. निवड समितीनं या सीरिजसाठी निवडलेल्या टीममध्ये कसोटी संघातील खेळाडूंचा समावेश केलेला नाही. आगामी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरिजचा विचार करुन त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. T20 टीममध्ये नवोदीत खेळाडूंचा प्रामुख्यानं समावेश असल्याचं अनुभवी ऑल राऊंडर हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी आहे.
टीम इंडियाचा नवा बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्कलच्या मार्गदर्शनाखाली हार्दिकनं ग्वाल्हेरमध्ये बॉलिंगचा सराव केला. त्यावेळी मॉर्कल हार्दिकच्या बॉलिंगवर नाराज दिसल्याचं वृत्त आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे नाराजीचं कारण?
या विषयायवर प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार स्टंपच्या अगदी जवळून बॉलिंग करण्याच्या हार्दिकच्या शैलीवर मॉर्केलनं नाराजी व्यक्त केली. दोघांमध्ये या विषयावर बराच काळ चर्चा झाली. यावेळी मॉर्केलनं काही गोष्टी हार्दिकला समजावून सांगितल्या.
क्रिकेटच्या वर्तुळात मितभाषी म्हणून प्रसिद्ध असलेला मॉर्केल सातत्यानं हार्दिकला बॉलिंगच्या सूचना देत होता. हार्दिकच्या बॉल टाकण्याच्या पद्धतीवरही मॉर्केलनं काही सुधारणा सांगितल्या आहेत. हार्दिक पांड्यासोबत काम केल्यानंतर मॉर्केलनं अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि मयांक यादव यांच्या बॉलिंगवर फोकस केला. मयांक यादवची पहिल्यांदाच T20 टीममध्ये निवड झाली आहे.
( नक्की वाचा : WTC Points Table : बांगलादेशला लोळवल्यानंतर टीम इंडिया सुसाट, फायनलसाठी कसं आहे समीकरण? )
बांगलादेशविरुद्धच्या T20 सीरिजसाठी निवडण्यात आलेल्या टीममध्ये अभिषेक शर्मा, रिंकू सिंह, रियान पराग आणि नितीश कुमार रेड्डी या T20 स्पेशालिस्ट तरुण खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती देखील मोठ्या कालखंडानंतर टीम इंडियाच्या T20 टीममध्ये पुनरागमन करत आहे.
भारताची T20 टीम : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकिपर) रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (विकेटकिपर), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयांक यादव