जाहिरात

WTC Points Table : बांगलादेशला लोळवल्यानंतर टीम इंडिया सुसाट, फायनलसाठी कसं आहे समीकरण?

WTC 2023-25 Points Table : भारताच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे.

WTC Points Table : बांगलादेशला लोळवल्यानंतर टीम इंडिया सुसाट, फायनलसाठी कसं आहे समीकरण?
Team India (@AFP)
मुंबई:

WTC 2023-25 Points Table : भारतानं बांगलादेशविरुद्ध झालेली टेस्ट सीरिज 2-0 अशा फरकानं जिंकली आहे. पावसाचा अडथळा देखील भारताला कानपूरमधील विजयापासून रोखू शकला नाही. टीम इंडियानं ही टेस्ट 7 विकेट्सनं जिंकली. भारतीय क्रिकेट टीमनं मायदेशात जिंकलेली ही सलग 18 वी टेस्ट सीरिज आहे.

भारताच्या विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट टेबलमध्ये मोठा बदल झाला आहे. भारतानं ही सीरिज 2-0 अशा फरकानं जिंकत नंबर 1 वरील जागा आणखी बळकट केली. ही सीरिज जिंकल्यानंतर टीम इंडियाचे 74.24 पर्सेंटेज ऑफ पॉईंट्स (PCT)  झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील या टप्प्यात टीम इंडियानं आत्तापर्यंत 11 टेस्ट खेळल्या असून त्यापैकी 8 टेस्ट जिंकल्या आहेत.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टीम इंडियाचे मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचे आत्तापर्यंत अनुक्रमे 62.50 आणि 55.56 पर्सेंटेज पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियानं या टप्प्यात आत्तापर्यंत 12 तर श्रीलंकेनं 9 टेस्ट मॅच खेळल्या आहेत.

Latest and Breaking News on NDTV

कसा आहे टीम इंडियाचा मार्ग ?

टीम इंडियाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या या टप्प्यात आणखी 8 टेस्ट शिल्लक आहेत. त्यापैकी 3 न्यूझीलंडविरुद्ध तर 5 ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या टेस्ट भारतामध्ये तर ऑस्ट्रेलिया विरुद्धची टेस्ट सीरिज ऑस्ट्रेलियात होणार आहे. भारताला या स्पर्धेची सलग तिसऱ्यांदा फायनल गाठण्यासाठी उर्वरित आठपैकी किमान तीन टेस्ट मॅच जिंकण्याची गरज आहे.

IND vs BAN : टीम इंडियानं दाखवली बांगलादेशला जागा, 3 दिवसांमध्येच मिळवला दणदणीत विजय

( नक्की वाचा :  IND vs BAN : टीम इंडियानं दाखवली बांगलादेशला जागा, 3 दिवसांमध्येच मिळवला दणदणीत विजय )

न्यूझीलंडविरुद्ध होणारी तीन टेस्टची सीरिज भारतानं 3-0 अशा फरकानं जिंकली तर टीम इंडियाचा फायनलमधील प्रवेश जवळपास नक्की होईल. डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील एका टेस्टमधील विजय टीम इंडियाची फायनलमधील जागा नक्की करेल. त्या सीरिजमध्ये एकही टेस्ट जिंकण्यास टीम इंडियाला अपयश आलं तर भारतीय टीमचं भवितव्य श्रीलंकेच्या वाटचालीवर अवलंबून असेल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
IND vs BAN : टीम इंडियानं दाखवली बांगलादेशला जागा, 3 दिवसांमध्येच मिळवला दणदणीत विजय
WTC Points Table : बांगलादेशला लोळवल्यानंतर टीम इंडिया सुसाट, फायनलसाठी कसं आहे समीकरण?
mohammad-rizwan-expected-next-captain-pakistan-limited-overs-team-babar-azam-resignation
Next Article
Babar Azam : बाबर आझमनंतर पाकिस्तानचा कॅप्टन होण्यासाठी 'हा' खेळाडू आघाडीवर