Champions Trophy : टीम इंडियाच्या जर्सीवर चक्क पाकिस्तानचं नाव, स्पर्धा सुरु होण्यापूर्वी समजलं सत्य

ICC Champions Trophy 2025:  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्यास आता काही तास उरले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

ICC Champions Trophy 2025:  आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु होण्यास आता काही तास उरले आहेत. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) लढतीनं बुधवारी (19 फेब्रुवारी, 2025) ही स्पर्धा सुरु होत आहे. भारतीय क्रिकेट टीम मात्र सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेतील अभियानाची सुरुवात 20 फेब्रुवारी रोजी बांगलादेश विरुद्ध करणार आहे. मुख्य स्पर्धा सुरु होण्याच्या काही तास आगोदर टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

BCCI नं अधिकृत अकाऊंटवर प्रमुख खेळाडडूंची फोटो शेअर केली आहेत. कॅप्टन रोहित शर्मा, व्हाईस कॅप्टन शुबनन गिल, अनुभवी खेळाडू विराट कोहली, श्रेयस अय्यर यांची नव्या जर्सीमध्ये फोटो शेअर करण्यात आले आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. 

काय आहे कारण?

आयसीसीच्या नियमानुसार सर्व टीमचे खेळाडू जर्सीवर उजव्या बाजूला छातीवर आयसीसी इव्हेंटचा लोगो आणि यजमान देशाचं नाव लिहिणे बंधनकारक असते. भारतीय टीम या स्पर्धेतील सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. पण, अधिकृत यजमान देश पाकिस्तान आहे. याच कारणामुळे भारतीय खेळाडूंच्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव आहे. टीम इंडिया जर्सीवर फक्त स्पर्धेचा अधिकृत लोगो असेल, यजमानांचं नाव वगळण्यात येईल असं मानलं जात होतं. पण तसं करण्यात आलेलं नाही.

Advertisement

( नक्की वाचा : Champions Trophy : पाकिस्तानची बिकट अवस्था! भारत-पाक मॅचपूर्वी PCB प्रमुखांवर आली भयंकर वेळ )

23 तारखेला होणार हायव्होल्टेज लढत

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan ) ही हायव्होल्टेज लढत 23 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या लढतीकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. तर टीम इंडियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध दोन मार्च रोजी होणार आहे. साखळी स्पर्धेत दमदार कामगिरी केली तर टीम इंडियाला सेमी फायनलमध्ये प्रवेश मिळेल. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील भारतीय टीमला या स्पर्धच्या विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजलं जात आहे. 


चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीम : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती

Advertisement

राखीव खेळाडू : यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे आणि मोहम्मद सिराज