'सीनियर खेळाडूंसोबत तू...' BCCI नं गौतम गंभीरला विचारले 3 मोठे प्रश्न

Team India Head Coach: टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी झालेल्या मुलाखतीमध्ये गौतम गंभीरला 3 मोठे प्रश्न विचारण्यात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी गौतम गंभीरचं नाव सर्वात आघाडीवर आहे.
मुंबई:

Team India Head Coach:  टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीमध्ये गौतम गंभीरचं नाव सर्वात आघाडीवर आहे. 'ईएसपीएन क्रिकइन्फो'ला मिळालेल्या माहितीनुसार गंभीरनं या पदासाठी औपचारिक अर्ज केला आहे. त्याची मंगळवारी देखील मुलाखत झाली. गंभीरनं बीसीसीआय क्रिकेटच्या सल्लागार समितीशी (CAC) चर्चा झाली. भारतीय प्रशिक्षकपदासाठी उमेदवारांची नावं शॉर्टलिस्ट करण्याची जबाबदारी याच समितीवर सोपण्यात आली होती. गौतम गंभीरप्रमाणेच माजी क्रिकेटपटू WV रमन यांनी देखील मुलाखत दिली आहे, असं वृत्त रेव स्पोर्ट्सनं दिलंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

गंभीरला विचारले 3 मोठे प्रश्न

गौतम गंभीरला या मुलाखतीच्या दरम्यान BCCI नं 3 मोठे प्रश्न विचारले अशी माहिती समोर आली आहे. 

1. टीमच्या कोचिंग स्टाफबाबत तुझं मत काय?
2. बॅटींग आणि बॉलिंग या दोन विभागातील सीनियर खेळाडूंसह तो नव्या बदलाचा कसा समन्वय साधशील?
3. स्पिल्ट कॅप्टनसी, फिटनेसचा निकष आणि ICC ट्रॉफी जिंकण्यात टीमला येत असलेलं अपयश यावर तुझं काय मत आहे?

भारतीय टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे होती. बीसीसीआयनं आयपीएल 2024 दरम्यान गंभीरशी अनौपचारिक चर्चा केली होती. गंभीर यंदाच्या आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली केकेआरनं यंदा आयपीएल विजेतेपद पटकावलं. 

( नक्की वाचा : हरभजननं गॅरी कस्टर्नना दिला जाहीर सल्ला, गंभीरला येऊ शकतो राग! )
 

गंभीरनं आयपीएल दरम्यान अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानंतर 1 जून रोजी अबू धाबीमधील एका कार्यक्रमात बोलताना त्यानं भारतीय टीमचा कोच होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 'मला भारतीय टीमचा कोच व्हायला आवडेल. यापेक्षा मोठा सन्मान नाही. आपल्या राष्ट्रीय टीमला कोचिंग करण्यासारखा दुसरा सन्मान नाही. तुम्ही 140 कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करता. यापेक्षा मोठं काही नाही,' असं गंभीरनं सांगितलं. 
 

Advertisement

Topics mentioned in this article