IND vs ENG : 'हार्दिक पांड्या' फॅक्टरमुळे जसप्रीत बुमराहला कॅप्टनसी नाही! माजी कोचनं सांगितलं कारण

India Tour of England : हित शर्मा रिटायर झाल्यानंतर  फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कॅप्टन होईल, असा अंदाज होता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

India Tour of England : आयपीएल 2025 नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) रिटायर झालाय. त्यामुळे त्याची जागा कोण घेणार? याची सर्वांना उत्सुकता आहे. रोहित शर्मा रिटायर झाल्यानंतर  फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) कॅप्टन होईल, असा अंदाज होता. पण, कॅप्टनपदासाठी शुबमन गिलचं (Shubman Gill) नाव सध्या आघाडीवर आहे. कॅप्टनपदाच्या शर्यतीमध्ये बुमराह मागे पडण्याचं कारण हे 'हार्दिक पांड्या' फॅक्टर आहे, असं मानलं जात आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे हार्दिक पांड्या फॅक्टर?

टीम इंडियाचा माजी बॅटिंग कोच संजय बांगर (Sanjay Bangar) यांनी या या फॅक्टरकडं लक्ष वेधलं आहे. हार्दिक पंड्याला टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन करण्यात आलं नाही त्याच कारणामुळे बुमराह सध्या मागे पडलाय, असं बांगरनं सांगितलं. 

Advertisement

हार्दिकला फिटनेसची समस्या आहे. त्यामुळे तो सर्व सामने खेळू शकेल का? हा प्रश्न आहे. त्यामुळे प्लेईंग इलेव्हनमध्ये हमखास असेल या खेळाडूला कॅप्टन करण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीनं सुर्यकुमार यादवला टी20 टीमचा कॅप्टन करण्यात आलं. याच कारणानुसार टेस्ट टीममध्ये बुमराहच्या जागी गिल कॅप्टन होऊ शकतो, असं मत बांगरनं व्यक्त केलंय. बुमराह फास्ट बॉलर असल्यानं कामाचा ताण आणि दुखापतींची समस्या हे तो कॅप्टन होण्यासाठी अडचणीचे फॅक्टर आहे. त्यामुळे गिलचं नाव सध्या आघाडीवर आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : IND vs ENG: रोहित शर्मानंतर 'हा' खेळाडू होणार टीम इंडियाचा कॅप्टन! गंभीरसोबत झाली 5 तास चर्चा )
 

'या' खेळाडूला करा कॅप्टन

बीसीसीआयनं टेस्ट टीमचा कॅप्टन निवडण्याची घाई करु नये. त्यांनी या फॅरमॅटमधील अनुभवी खेळाडू केएल राहुलला (KL Rahul) कॅप्टन करावं असं मत बांगरनं व्यक्त केलं आहे. गिल टेस्टमधील लढवय्या खेळाडू आहे. त्यानं भारतासाठी ओपनिंगला येऊन अनेक महत्वपूर्ण इनिंग खेळल्या आहेत. तो सर्व टेस्ट खेळू शकतो. त्याच्या बहुतेक सेंच्युरी आणि मोठ्या इनिंग परदेशातील आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या क्षमतेवर प्रश्न नाही. तो जास्त मोठा देखील नाही. तुम्ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सायकलचा विचार करता, ही सायकल दोन वर्षांची असते. मला वाटते की राहुल सध्या 31-32 वर्षांचा आहे. तो ही संपूर्ण सायकल नक्की खेळू शकतो, असं बांगरनं स्पष्ट केलं.
 

Advertisement