Team India Return: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली मुंबईत विजयी मिरवणूक निघणार का? वाचा सर्व माहिती

Champions Trophy 2025 : टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. या विजयानंतर टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार का? याची फॅन्सना उत्सुकता आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Champions Trophy 2025 : टीम इंडियानं तब्बल 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. दुबईत रविवारी (9 मार्च) रोजी झालेल्या मॅचमध्ये भारतानं न्यूझीलंडचा 4 विकेट्सनं पराभव केला. यापूर्वी भारतानं 2013 साली महेंद्रसिंह धोनीच्या कॅप्टनसीमध्ये विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आता 2025 मध्ये रोहित शर्माच्या कॅप्टनसीमध्ये हे विजेतेपद पटकावले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. या विजयानंतर टीम इंडियाची विजयी मिरवणूक निघणार का? याची फॅन्सना उत्सुकता आहे. दक्षिण आफ्रिकेत 2007 साली T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या टीमची विजयी मिरवणूक मुंबईत निघाली होती. त्यानंतर 2024 साली वेस्ट इंडिजमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही रोहित शर्माच्या टीमची मिरवणूक काढण्यात आली होती.

आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद 12 वर्षांनी विजेतेपद मिळवल्यानंतर पुन्हा एकदा भारतीय टीमची मिरवणूक मुंबईच्या रस्त्यावर निघणार का? याबाबत चर्चा सुरु झाली आहे. विशेषत: वानखेडे स्टेडियमच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात बोलताना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून T20 वर्ल्ड कपसारखीच विजयी मिरवणूक काढून वानखेडेवर येण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

( नक्की वाचा : Ravindra Jadeja : 'धन्यवाद' निवृत्तीच्या चर्चांवर रविंद्र जडेजानं सोडलं मौन, 4 शब्दांची पोस्ट Viral )
 

विजयी मिरवणूक निघणार का?

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय खेळाडू सोमवारी (10 मार्च) भारतामध्ये परतणार आहेत. टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर दिल्लीत दाखल झाला आहे. कॅप्टन रोहित शर्मा देखील मायदेशी परतला असून अन्य खेळाडूही दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

Advertisement

भारतीय टीममधील सर्व खेळाडू एकत्र न येता वेगवेगळी मायदेशी परतली आहेत. त्यामुळे विजयी मिरवणूक निघण्याची शक्यता जवळपास समाप्त झाली आहे. यंदा विजयी मिरवणूक न निघण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या सिझनला (IPL 2025) 22 मार्च पासून आयपीएल स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत सर्व भारतीय खेळाडू वेगवेगळ्या टीमकडून खेळणार आहेत. दोन महिने चालणाऱ्या आयपीएलपूर्वी सर्व खेळाडूंना पुरेशी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ही मिरवणूक निघणार नाही, असं मानलं जात आहे.  
 

Advertisement