ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) क्रमवारीत अव्वल टी-20 फलंदाज ठरला आहे. भारताच्या सूर्यकुमार यादवला त्याने मागे टाकले आहे. डिसेंबर 2023 पासून सूर्यकुमार यादव टी 20 मधील नंबर वन फलंदाज होता. सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीमुळे ट्र्रॅव्हिस हेडने अव्वल क्रमांक मिळवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सूर्यकुमार यादवने टी 20 क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र ट्रॅव्हिस हेडला वर्ल्ड कपमधील कामगिकीचा फायदा झाला आहे. ट्रॅव्हिस हेडने नुकत्याच संपलेल्या सुपर 8 फेरीत दोन अर्धशतकांसह 255 धावा केल्या. यामध्ये त्याने भारताविरुद्ध 76 धावांची शानदार खेळीही खेळली. आता पुन्हा अव्वल स्थान मिळवण्यासाठी सूर्याला ट्रॅव्हिस हेडशी जोरदार मुकाबला करावा लागणार आहे.
(नक्की वाचा - IND vs ENG सेमी फायनलवर पावसाचं सावट, मॅच रद्द झाली तर टीम इंडियाचं काय होणार?)
सूर्यकुमारला अव्वल स्थानी येण्याची पुन्हा संधी
सूर्यकुमार यादवला पुन्हा स्थान काबीज करण्याची मोठी संधी आहे. भारत वर्ल्ड कपच्या बाद फेरीत खेळत आहे. सूर्यकुमारजी बॅट या स्पर्धेत चांगलीच तळपली आहे. चांगली गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादव गुणांच्या बाबतीत ट्रॅव्हिस हेडपेक्षा केवळ दोन गुणांनी मागे आहे. ताज्या क्रमवारीत सूर्यकुमारचे 842 गुण आहेत, तर ट्रॅव्हिस हेडच्या खात्यात 844 गुण आहेत. सूर्याने चांगली कामगिरी केली तर त्याला पुन्हा नंबर वन होण्याची संधी आहे.
(नक्की वाचा- भारताच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर इंझमाम-उल-हकनं केला खळबळजनक आरोप)
टी-20 मधील टॉप 5 खेळाडू
- ट्रॅव्हिस हेड
- सूर्यकुमार यादव
- फिल सॉल्ट
- बाबर आझम
- मोहम्मद रिझवान