जाहिरात

भारताच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर इंझमाम-उल-हकनं केला खळबळजनक आरोप

T20 World Cup IND vs AUS : भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर इंझमाम-उल-हकनं खळबळजनक आरोप केलाय.

भारताच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर इंझमाम-उल-हकनं केला खळबळजनक आरोप
Inzamam-ul-Haq Claim Ball Tampering
मुंबई:

Inzamam-ul-haq claim ball tampering by Team India : टीम इंडियानं सुपर 8 मधील लढतीत ऑस्ट्रेलियाचा 24 रननं पराभव केला. या विजयासह भारतीय टीमनं टी20 वर्ल्ड कपची सेमी फायनल गाठली आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 206 रनचं लक्ष्य ठेवलं होतं. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाला 181 रनच करता आले. आता सेमी फायनलमध्ये भारताची लढत इंग्लंडशी होणार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इंझमामचा खळबळजनक आरोप

भारताच्या या विजयानंतर पाकिस्तान क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन इंझमाम-उल-हकनं खळबळजनक आरोप केलाय. भारताचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगनं (Arshdeep Singh) बॉल टेम्परिंग केल्याचा आरोप इंझमामनं केलाय. अर्शदीप 15 वी ओव्हर टाकत होता त्यावेळी बॉल रिव्हर्स स्विंग होत होता, असा दावा इंझमामनं पाकिस्तानी टीव्ही चॅनलवरील कार्यक्रमात बोलताना केला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

'हे खूप लवकर होते. तुम्ही 15 व्या ओव्हर टाकत आहात. त्याच ओव्हरमध्ये बॉल रिव्हर्स स्विंग होतोय. आम्हाला रिव्हर्स स्विंग चांगला समजतो. अर्शदीप 15 व्या ओव्हरमध्येच रिव्हर्स स्विंग करत असेल तर बॉलवर काहीतरी सीरियस काम झालं आहे, असा आरोप इंझमामनं केला. पाकिस्तानच्या बॉलरकडून हे झालं असतं तर खूप गोंधळ झाला असता, असा दावाही त्यानं यावेळी केला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com