IPL 2025 : आयपीएल 2025 च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सने पराभव केला. या शानदार विजयासह पंजाबने 11 वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सामन्यात श्रेयस अय्यरने 87 धावांची निर्णायक खेळी केली. श्रेयस अय्यरने हा सामना अक्षरश: खेचून आणला. मात्र संपूर्ण सामन्यात श्रेयस शांत आणि संयमाने आपला खेळ करत होता. मात्र एक असा आला जिथे श्रेयसचा पारा चढला होता. एक व्हिडिओ सध्या सोशल व्हायरल होत आहे ज्यामध्ये श्रेयस अय्यर शशांक सिंहवर संतापलेला दिसत आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सामन्यानंतर काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत की, सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांना हस्तांदोलन करत होते. त्यावेळी शशांक सिंह देखील श्रेयस अय्यरला हस्तांदोलन करायला आला. मात्र श्रेयसने शशांकसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिला. उलट श्रेयस शशांकवर संतालेला दिसला. त्याला शिविगाळ देखील करताना दिसत आहे. याबद्दल श्रेयस अय्यरकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पण शशांक सिंह ज्या पद्धतीने आपली विकेट गमावली त्यावर अय्यर नाराज होता, असा अंदाज लावला जात आहे.
(नक्की वाचा- विराटच्या बंगळुरूतील One8 Commune रेस्टॉरंट-बारविरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?)
सामन्यात काय घडलं?
झालं असं की, सामन्यात शशांक सिंह अतिशय बेजबाबदार पद्धतीने धावबाद झाला.पंजाबला विजयासाठी 20 चेंडूत 35 धावांची गरज असताना शशांक सिंह धावबाद झाला. त्यावेळी श्रेयस अय्यरही क्रीजवर होता. शशांक ज्या पद्धतीने बाद झाला ते श्रेयसला अजिबात आवडलं नाही. तिथेच अय्यर शशांकवर संतापला होता.
(नक्की वाचा- IPL 2025 Final : बघा पटतंय का! यंदाची IPL कोण जिंकणार? मायकल क्लार्कने वर्तवले भाकीत)
सामना एका निर्णायक टप्प्यावर होता. शशांककडे क्रीजवर असणे खूप गरजेचं होतं. त्यामुळे श्रेयसचं रागावणं स्वाभाविक होतं. श्रेयस अय्यर हा कूल स्वभावाचा कर्णधार म्हणून ओळखला जातो. मात्र शशांकच्या चुकीमुळे त्याचा राग शिगेला पोहोचला होता. सामन्यानंतर शशांक सिंहच्या चेहऱ्यावर नाराजी दिसून येत होती. प्रशिक्षक रिकी पॉन्टिंग त्याला धीर देताना दिसला.