
Virat Kohli One8 Restaurant : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या बंगळुरुतील One8 Commune Bar & Restaurant वर कारवाई करण्यात आली आहे. बंगळुरूमधील कस्तुरबा रोडवर हे बार अँड रेस्टॉरंट आहे. तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
One8 बार अँड रेस्टॉरेंटवर विशिष्ट स्मोकिंग झोनशिवाय उघड्यावर धूम्रपान करण्यास परवानगी दिल्याचा आरोप आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वन8 कम्यून हा विराट कोहलीच्या लाइफस्टाइल ब्रँड 'वन8' चा एक भाग आहे.
(नक्की वाचा- IPL 2025 Final : बघा पटतंय का! यंदाची IPL कोण जिंकणार? मायकल क्लार्कने वर्तवले भाकीत)
पोलिस एफआयआरनुसार, 29 मे रोजी संध्याकाळी वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल मणिकांत नायक यांना याबद्दल गुप्त माहिती मिळाली होती. या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना कोणत्याही नियुक्त केलेल्या धूम्रपान क्षेत्राशिवाय धूम्रपान करण्याची परवानगी आहे.
माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथकाने रेस्टॉरंटमध्ये जाऊन चौकशी केली. धूम्रपान करण्यासाठी कोणतेही निश्चित क्षेत्र नसतानाही ग्राहक उघडपणे धूम्रपान करत असल्याचे घटनास्थळी आढळून आले. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास मनाई असणाऱ्या तंबाखू नियंत्रण कायद्याचे हे स्पष्ट उल्लंघन होते.
(नक्की वाचा : आयपीएल 2025 चा फायनल एकदम खास! 9 वर्षांनंतर पहिल्यांदाच असं घडणार)
व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध न्यायालयाच्या परवानगीने, या प्रकरणात औपचारिक गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि याशी संबंधित इतर कोणत्या नियमांचे उल्लंघन झाले आहे ते पाहिले जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world