Vinesh Phogat : अखेर तिने जिंकलं! विनेश फोगाटचा सुवर्ण पदकाने गौरव

विनेश फोगाट भारतात परतल्यानंतर हरियाणातील आपल्या गावी बलाली येथे पोहोचली. तिथेही तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या कमिटीने तिथे तिचं गोल्ड मेडल देऊन स्वागत केलं.

Advertisement
Read Time: 2 mins

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये शेवटपर्यंत लढून देखील विनेश फोगाटच्या पदरी निराशा पडली. 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहोचलेल्या विनेश फोगाटला सामन्याच्या काही तास आधी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. त्यामुळे पदक निश्चित झालं असताना देखील तिला पदकाविनाच भारतात परतावं लागलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र भारतात विनेशचे एखाद्या विजेत्याप्रमाणे स्वागत झालं. शेकडो लोकांनी तिचं मोठ्या जल्लोषात दिल्लीत स्वागत केलं. मायदेशात परतताच तिला सुखद धक्का बसला आहे. तिला सिल्वर ऐवजी गोल्ड मेडल मिळालं आहे. 

विनेश फोगाट भारतात परतल्यानंतर हरियाणातील आपल्या गावी बलाली येथे पोहोचली. तिथे तिचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या कमिटीने तिथे तिचं गोल्ड मेडल देऊन स्वागत केलं. गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानानंतर विनेश देखील आनंदी दिसली. 

( नक्की वाचा : प्रतीक्षा संपली! विनेश फोगाटच्या याचिकेवर CAS चा निर्णय जाहीर )

Advertisement

विनेश फोगाटने म्हटलं की,  गावकऱ्यांनी केलेल्या सन्मानाने मी भारावून गेली आहे. माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. बलालीमधील मुलींना ट्रेनिंग देऊ शकले आणि त्यांना यशस्वी बनवू शकले तर मला अभिमान वाटेल. मात्र गावातून कुणी कुस्तीपटू तयार होत नसेल तर हे निराशाजनक आहे. गावकऱ्यांनी मुलींना, महिलांना सहकार्य केलं पाहिजे, असं आवाहन देखील विनेशने  केलं.  

(नक्की वाचा-  vinesh phogat disqualified : विनेश फोगाटचं वजन कसं वाढलं, वजनाकडे कसं दुर्लक्ष झालं? चूक कोणाची?)

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये काय घडलं?

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटातील कुस्तीमध्ये विनेशनं फायनलमध्ये धडक मारली होती. पण, फायनलपूर्वी झालेल्या टेस्टमध्ये तिचे वजन 100 ग्रॅम जास्त भरले. त्यामुळे तिला फायनलसाठी अपात्र ठरवण्यात आलं. हा विनेशसह संपूर्ण देशाला मोठा धक्का होता. या प्रकरणानंतर विनेशनं कृस्तीमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विनेशला अपात्र ठरवण्याच्या निर्णयाविरोधात भारतानं आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडं अपिल केलं होतं. पण, लवादानं भारताची याचिका फेटाळली. त्यामुळे विनेशचं ऑलिम्पिक मेडल जिंकण्याचं स्वप्न भंगलं. 

Advertisement