सचिन-विनोदच्या भेटीचा VIDEO VIRAL, कांबळीची अवस्था पाहून नेटकऱ्यांचा तेंडुलकरवर संताप  

Vinod Kambli Viral Video : सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीही या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Vinod Kambli Viral Video : क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विनोद कांबळी यांचे बालपणीचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम बुधवारी (3 डिसेंबर) पार पडला. यादरम्यान सचिन तेंडुलकर आणि विनोदी कांबळीच्या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमींपासून सर्वसामान्य देखील व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देऊन आपल्या भावना व्यक्त करत आहेत. विनोद कांबळीला व्यासपीठावर पाहताच सचिन तेंडुलकर त्याला भेटण्यासाठी गेला आणि हात मिळवला. क्षणभर कोणाकडून हातमिळवणी करण्यात आलीय, हे कांबळीला कळलंच नाही. पण सचिन असल्याचे लक्षात आल्यानंतर कांबळी प्रचंड खूश झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय.  

(नक्की वाचा: मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल)

दुसरीकडे विनोदी कांबळीची अवस्था पाहुन नेटकरी त्याच्या प्रति सहानुभूती व्यक्त करत आहेत. कांबळीने जेव्हा सचिनचा हात धरला तेव्हा एक व्यक्ती आली आणि कांबळीचा हात सोडवून त्याला समजावण्याचा प्रयत्न करू लागली. त्याच व्यक्तीने सचिनला त्याच्या जागी जाण्याचीही विनंती केली. सचिन दूर झाल्यानंतर कांबळीच्या चेहऱ्यावर वेगळेच दुःख दिसले. त्याला सचिनची गळाभेट घ्यायची होती पण ते शक्य झाले नाही, त्यामुळे तो नाराजही झाला. कांबळीच्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी चाहते आणि नेटकऱ्यांचंही लक्ष वेधले. सचिन-कांबळीच्या भेटीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी नेमक्या काय प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, जाणून घेऊया...

Advertisement

santosh_santa12 नावाच्या युजरने म्हटलंय की - "मित्राच्या बाजूला बसू शकत नाही व यांना लोक देवाची उपमा देतात. विचार करा."

Photo Credit: PTI

 starwalker_369 नावाच्या युजरने म्हटलंय की, "मित्राच्या बाजूला बसायला काहीच हरकत नव्हती... Feeling sad for विनोद जी"

Photo Credit: PTI

(नक्की वाचा: साराचं ठरलं! लाडक्या लेकीबाबत सचिननं केली मोठी घोषणा)

sondkarvasudev युजरने म्हटलंय की, "जीवनात आला आहात तर खूप विचारपूर्वक मित्र निवडा..."

Photo Credit: PTI

 richest_by_karma नावाच्या युजरने म्हटलंय की, "दिवस बदलले मित्र पलटला हिच खरी दुनियादारी"

Photo Credit: PTI

(नक्की वाचा:  'मी रिलेशनशिपमध्ये होते पण...' मिताली राजनं सांगितलं लग्न न करण्याचं कारण, पाहा Video)

Photo Credit: PTI

 तर काही नेटकऱ्यांनी सचिन तेंडुलकरचे कौतुकही केले आहे.

Photo Credit: NDTV Marathi

VIDEO : सचिनला पाहताच विनोद कांबळीचा चेहरा खुलला