'विनोद कांबळी दारुच्या नशेत नव्हता'; मित्राकडून सोशल मीडियावरील चर्चांना पूर्णविराम

Vinod Kambli Song Video : व्हिडीओत 52 वर्षांच्या विनोद कांबळीची तब्येत खालावलेली दिसली. विनोद कांबळीबाबत अनेक चर्चा या व्हिडीओनंतर सुरु झाल्या होत्या. यावर आता त्याच्या जुन्या मित्राने  खुलासा केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाच्या अनावरणाचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी मुंबईत पार पडला. या कार्यक्रमातील सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या दोन मित्रांचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. व्हिडीओत 52 वर्षांच्या विनोद कांबळीची तब्येत खालावलेली दिसली. विनोद कांबळीबाबत अनेक चर्चा या व्हिडीओनंतर सुरु झाल्या होत्या. यावर आता त्याच्या जुन्या मित्राने  खुलासा केला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या कार्यक्रमात विनोद कांबळीचा गाणे गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. कांबळी ज्या पद्धतीने गात होता त्यावरून तो दारूच्या नशेत असल्याचे अनेकांना वाटलं. सोशल मीडियावर अनेकांनी तसा दावा देखील केला. मात्र आता त्याचा मित्र मार्कस कौटोने या कार्यक्रमात कांबळी भावुक झाला होता, असं सांगितलं. 

(नक्की वाचा: सचिन-विनोदच्या भेटीचा VIDEO VIRAL, कांबळीची अवस्था पाहून नेटकऱ्यांचा तेंडुलकरवर संताप)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, कौटोने सांगितलं की, विनोद कांबळी दारुच्या नशेत नव्हता. गेल्या एक वर्षापासून त्याने दारूच्या थेंबालाही हात लावलेला नाही. सचिनसोबतच्या छोट्या भेटीत तो खूप भावुक झाला होता. सचिनला भेटण्यासाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तो खूप उत्सुक होता.

(नक्की वाचा: मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल)

विनोद कांबळीने गायलं गाणं

यावेळेस विनोद कांबळीला बोलणंही कठीण ठरत होतं पण त्याचा उत्साह बराच होता. आचरेकर सरांसाठी त्याने 'सर जो तेरा चकराए' हे सदाबहार गाणे गायलं. ज्याच्यासाठी साधे बोलणे कठीण आहे, त्याने चक्क एखादं गाणे गाऊन दाखवणे फार मोठी बाब आहे. यावेळेस विनोदने सचिनसह उपस्थितांचे मन जिंकले आणि सचिनने आपल्या मित्रासाठी टाळ्या देखील वाजवल्या.  

Advertisement