Virat Kohli Retirement: T20 विजेतेपदानंतर विराट कोहली भावुक, निवृत्त होताना दिला खास संदेश

Virat Kohli : भारतीय टीम आणि फॅन्सनी विजेतेपदाचं सेलीब्रेशन सुरु केलं होतं... त्याचवेळी विराट कोहलीनं (Virat Kohli) निवृत्तीची मोठी घोषणा केली.

Advertisement
Read Time: 2 mins
Virat Kohli Retirement
मुंबई:

Virat Kohli Retirement From T20 International:  टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये  (Team India Win T20 WC 2024) दक्षिण आफ्रिकेला 7 रननं पराभूत  (Team India Win T20 WC 2024) करत विश्वविजेतेपद पटकावलं. भारतीय टीम आणि फॅन्सनी विजेतेपदाचं सेलीब्रेशन सुरु केलं होतं... त्याचवेळी विराट कोहलीनं (Virat Kohli) निवृत्तीची मोठी घोषणा केली. टीम इंडियाच्या विजेतेपदासोबतच विराटनं टी 20 इंटरनॅशनलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारतानं फायनलमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करत निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 176 रन केले. टीम इंडियाकडून विराटनं सर्वाधिक 76 रन केले. संपूर्ण स्पर्धेत फेल गेलेल्या विराटनं त्याचा सर्वोत्तम खेळ फायनलसाठी राखून ठेवला होता. पहिल्या तीन विकेट्स झटपट गेल्यानंतर विराटनं अक्षर पटेलच्या मदतीनं भारताची इनिंग सावरली. अक्षरनं 47 रन करत भारताच्या इनिंगमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं. भारतानं दिलेलं 177 रनचं आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलवलं नाही. त्यांना 8 आऊट 169 रनपर्यंतच मजल मारता आली. भारतानं 11 वर्षांनी एखाद्या आयसीसी स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. तर 17 वर्षांनी टी20 विजेतेपदाला गवसणी घातली.

विराटची निवृत्तीची घोषणा

विराट कोहलीला फायनलमधील कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी बोलताना विराटनं T20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराटनं भावुक स्वरात त्याच्या मनातील भावना जगाला सांगितल्या. तो मॅचनंतर बोलताना म्हणाला की, 'आता पुढच्या पिढीकडं धुरा सोपवण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप होता. आम्हाला नेमकं हेच साध्य करायचं होतं. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटतं की तुम्हाला रन काढता येणार नाहीत, आणि तसंच होतं. देव सर्वशक्तीमान आहे. एक संधी हवी असते. आता नाही तर कधीच नाही अशी ही परिस्थिती होती. 

( नक्की वाचा : IND vs SA Final : 'कठीण समय येता 'विराट' कामास येतो', फायनलमध्ये केली रेकॉर्डची बरोबरी )
 

ही माझी  भारतासाठी शेवटची T20 मॅच होती. आम्हाला विजेतेपदाची ट्रॉफी उंचवायची होती. हे एक ओपन सिक्रेट होतं. मी पराभूत झाल्यानंतर हा निर्णय जाहीर केला नसता असं नाही. पुढच्या पिढीनं T20 क्रिकेटला चालना देण्याची वेळ आली आहे. आमच्यासाठी ही खूप मोठी प्रतीक्षा होती. तुम्ही रोहित शर्माकडं पाहा. तो 9 टी20 वर्ल्ड कप खेळला आहे. हा माझा सहावा टी20 वर्ल्ड कप होता. या विजेतेपदावर त्याचा (रोहित शर्मा) हक्क आहे. सध्या भावनांवर नियंत्रण ठेवणं खूप अवघड आहे. मला वाटतंय की हे सर्व समजायला आणखी वेळ लागेल.'

Advertisement

विराट कोहलीची T20 कारकिर्द

विराट कोहलीनं 12 जून 2010 रोजी झिम्बाब्वे विरुद्ध टी20 इंटरनॅशनलमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 14 वर्षांच्या कारकि‍र्दीमध्ये 125 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं यामध्ये 48.69 च्या सरासरीनं 4188 रन केले. यामध्ये 38 हाफ सेंच्युरी आणि 1 सेंच्युरीचा समावेश आहे. 

Advertisement