Virat Kohli breaks silence on quitting as India, RCB captain: आयपीएल 2025 मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) ची कामगिरी दमदार झाली आहे. आरसीबीला आजवर एकदाही आयपीएल विजेतेपद मिळालेलं नाही, पण, ही टीम नेहमी चर्चेत असते. ही टीम चर्चेत का असते? याचं कारण देखील सर्वांना माहिती आहे. ते म्हणजे ही विराट कोहलीची टीम आहे. विराटनं टीमची कॅप्टनसी सोडली, पण तो आजही आरसीबीचा मुख्य चेहरा आहे. 2008 साली झालेल्या पहिल्या आयपीएल सिझनपासून तो कधीही आरसीबीपासून वेगळा झालेला नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आरसीबी आणि टीम इंडियाचा होता कॅप्टन
विराट कोहली दीर्घकाळ टीम इंडिया आणि आरसीबीचा कॅप्टन होता. त्यानं 2021 साली झालेल्या T20 वर्ल्ड कपनंतर T20 टीमची कॅप्टनसी सोडली. त्यानंतर दक्षिण आफ्रिका सीरिजमधील पराभवानंतर टेस्ट टीमचं कर्णधारपदही सोडलं. विराट इतक्यावरच थांबला नाही त्यानं 2022 मध्ये आरसीबीची कॅप्टनशिप सोडून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं.
विराट कोहलीनं कर्णधारपदाच्या जबाबदारीमधून मुक्त होण्याचा निर्णय का घेतला? याबाबत वेगवेगळी कारणं सांगितली जात होती. पण, विराट त्यावर सविस्तर कधी बोलला नव्हता. अखेर एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये विराटनं स्वत: याबाबतचं कारण सांगितलं आहे.
( नक्की वाचा : IPL 2025 : रोहित शर्मा फिल्डिंग का करत नाही? मुंबई इंडियन्सनं पहिल्यांदाच सांगितलं कारण )
काय म्हणाला विराट?
विराटनं आरसीबी बोल्ड डायरिज पॉडकास्टशी बोलताना सांगितलं की, 'एक काळ असा होती की त्यावेळी माझ्या कारकिर्दीमध्ये खूप काही घडत होते. मी बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरल्यावर माझ्याकडून सर्वांना मोठी अपेक्षा होती. त्यामुळे मला माझं लक्ष्य केंद्रीत करण्यास त्रास होत होता. मी सतत त्याचाच विचार करत होतो. मी 2022 साली जवळपास एक महिना ब्रेक घेतला. त्या कालावधीमध्ये बॅट हातामध्ये घेतली देखील नाही.
दीर्घकाळ खेळायचं असेल तर आनंदी राहणे आवश्यक आहे, हे मला उमगलं. त्यानंतर मी कॅप्टनसी सोडण्याचा निर्णय घेतला, असं विराटनं या मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.