विराट कोहलीने तिसऱ्या कसोटी सामन्यात इतिहास रचला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला तेव्हा त्याच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 100 सामने खेळणारा विराट कोहली जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. यासह कोहलीने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे.
सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्धही 100 सामने खेळले आहेत. डेसमंड हेन्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 97 सामने खेळले आहेत, तर धोनीने 91 सामने आणि विवियन रिचर्ड्सने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 88 सामने खेळले आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामने
- सचिन तेंडुलकर- 110
- विराट कोहली- 100
- डेसमंड हेन्स- 97
- एमएस धोनी - 91
- विव्ह रिचर्ड्स- 88
कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
पर्थमध्ये शानदार शतक झळकावल्यानंतर आता कोहलीकडून गाबामध्ये शानदार खेळीची अपेक्षा आहे. कोहलीने पर्थमध्ये कसोटी कारकिर्दीतील 30 वे शतक झळकावले होते. मात्र दुसऱ्या डावात कोहली अपयशी ठरला. त्यामुळे भारताचा तिसरा कसोटी सामना जिंकायचा असेल तर विराटने चांगले प्रदर्शन केले पाहिजे, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे.
भारतीय संघात 2 बदल
तिसऱ्या कसोटीत रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. हर्षित राणा आणि अश्विनच्या जागी आकाशदीप आणि रवींद्र जडेजा यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर भारतीय संघ हा कसोटी सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.