'किंग' कोहलीचा नवा धमाका! केएल राहुलचा रेकॉर्ड मोडला; IPL इतिहासात सलामीवीर म्हणून मोठा विक्रम केला नावे

Virat Kohli Records: विराट कोहलीने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात 49 धावांची तुफानी खेळी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

आयपीएल 2026 मध्ये विराट कोहलीची बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात कोहलीने केवळ 34 चेंडूत 49 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने आयपीएलमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा केएल राहुलचा विक्रम मोडीत काढला. या विजयासह विराटने 2026 च्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही अव्वल स्थान पटकावले आहे.

सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार (भारतीय फलंदाज)

विराट कोहली: 185 षटकार
केएल राहुल: 184 षटकार
रोहित शर्मा: 148 षटकार
शिखर धवन:143 षटकार
शुभमन गिल: 118 षटकार

जागतिक स्तरावर ख्रिस गेल (326) आणि डेव्हिड वॉर्नर (210) यांच्यानंतर विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.

(नक्की वाचा-  VIDEO: मिरा-भाईंदरमधील रस्त्यावर 'झॉम्बी'? मुंबईसह परिसरात घबराट; काय आहे प्रकरण?)

सामन्याचा आढावा: आरसीबीची सरशी 

टॉस हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना लखनऊचा संघ 146 धावांवर गारद झाला. एडेन मार्करम आणि मिचेल मार्श यांनी चांगली सुरुवात केली, पण आरसीबीच्या गोलंदाजांनी पुनरागमन केले. रसिख सलाम डार याने 24 धावा देऊन सर्वाधिक 4 विकेट घेतले. भुवनेश्वर कुमारने 3, तर कृणाल पंड्याने 2 विकेट्स घेतल्या. आरसीबीने 149 धावांचे लक्ष्य 15.1 षटकांत 5 गडी राखून सहज पूर्ण केले.

Advertisement

ऑरेंज कॅपवर कोहलीचे वर्चस्व

विराट कोहली आयपीएल 2026 मध्ये आता सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. 5 डावांत त्याने 228 धावा केल्या आहेत. गेल्या 37 डावांचा विचार केल्यास विराटने तब्बल दोन शतके आणि अनेक अर्धशतके झळकावून सातत्य सिद्ध केले आहे. त्याच्या या तुफानी फॉर्ममुळे आरसीबीच्या प्लेऑफच्या आशा उंचावल्या आहेत.

Topics mentioned in this article