Bengaluru Stampede : विराट कोहलीच्या अडचणीत भर? चेंगराचेंगरी प्रकरणात पोलिसांमध्ये तक्रार!

Chinnaswamy Stadium stampede : बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंरीत 11 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची धग आता विराट कोहलीला ही बसली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Virat Kohli : विराट कोहलीच्या विरोधात बंगळुरु पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई:

Chinnaswamy Stadium stampede : बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंरीत 11 जणांचा मृत्यू झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावल्यानंतर झालेल्या विजयोत्सवात हा प्रकार घडला होता. या प्रकरणाची धग आता आरसीबीचा सर्वात मोठा सुपरस्टार विराट कोहलीला (Virat Kohli) देखील बसली आहे. शुक्रवारी विराटविरुद्ध बंगळुरुमध्ये पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'नैजा होराटागारारा वेदिके' (Naija Horatagaarara Vedike) च्या वतीने ए.एम. व्यंकटेश यांनी कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये विराटवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी ही तक्रार स्वीरारली आहे. या संदर्भात आधीच दाखल झालेल्या एफआयआरसोबत त्यांच्या तक्रारीचाही तपासामध्ये विचार केला जाईल, असे पोलिसांनी 
व्यंकटेश यांना कळवले आहे. 

( नक्की वाचा : बॉसच्या मागं लागून सुट्टी घेतली, लॅपटॉप टेबलवर ठेवून स्टेडियमकडे पळाली, विराटची जबरी फॅन परतलीच नाही! )
 

यापूर्वी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये कर्नाटक पोलिसांनी म्हटले आहे की, आरसीबी फ्रँचायझी, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म 'डीएनए' (DNA), आणि कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) प्रशासकीय समिती यांनी आवश्यक परवानग्यांशिवाय विजयोत्सव साजरा केला. त्याबाबत या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. 

दरम्यान, चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात कबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये आणखी दोन अतिरिक्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरीत जखमी झालेले आणि रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेतलेल्या रोलँड गोम्स यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, आरसीबी फ्रँचायझी, केएससीए (KSCA) आणि डीएनए (DNA) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 125(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


RCB मॅनेजमेंटचीही चौकशी 

आरसीबीच्या मॅनेजमेंटनं या चेंगराचेंगरीपूर्वी एक सोशल मीडिया पोस्ट केली होती. त्या पोस्टमुळे आरसीबी मॅनेजमेंट अडचणीत आलंय. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना (KSCA) च्या वरिष्ठ सदस्यांचाही या चौकशीत समावेश असेल, कारण सत्कार समारंभाच्या नियोजनातील त्यांची भूमिका आता बेंगळुरू पोलीस आणि दंडाधिकारी चौकशी समितीद्वारे तपासली जात आहे.

Advertisement