चेन्नई टेस्टमध्ये विराटनं केली भर मैदानात चूक, फॅन्स ते रोहित शर्मा सर्वांनाच धक्का

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिली टेस्ट सध्या चेन्नईत सुरु आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये मोठ्या ब्रेकनंतर परतलेल्या विराट कोहलीकडं (Virat Kohli) सर्वांचं लक्ष होतं. विराटला या टेस्टमध्ये फारशी कमाल करता आली नाही. त्याला पहिल्या इनिंगमध्ये फक्त 6 रन करता आले होते. त्यापाठोपाठ दुसऱ्या इनिंगमध्ये तो 17 रन काढूनच आऊट झाला. पण, या इनिंगमध्ये विराटनं एक मोठी चूक केली. त्याचा फॅन्स ते टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा सर्वांनाच धक्का बसला.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय झालं?

टीम इंडियाच्या 20 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बांगलादेशचा ऑफ स्पिनर मेहदी हसन मिराज ही ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट LBW असल्याचं अपिल बांगलादेशच्या खेळाडूंनी दिलं. मैदानातील अंपायरनं ते अपील मान्य करत विराटला आऊट दिलं. त्यामुळे चांगल्या लयीत वाटत असलेली विराटची इनिंग झटपट संपली.

अंपायरच्या निर्णयानंतर विराटनं त्याचा मैदानातील जोडीदार शुबमन गिलशी चर्चा केली आणि DRS न घेता परतण्याचा निर्णय घेतला. या बॉलचा रिप्ले दाखवला त्यावेळी सर्वांनाच धक्का बसला. कारण, बॉल पॅडला लागण्यापूर्वी विराटच्या बॅटला लागला होता. बॉल बॅटला लागल्याची जाणीव विराटला झालीच नाही. ड्रेसिंग रुममधून हा रिप्ले पाहत असलेला टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा देखील चांगलाच नाराज झाला होता.   

भारताकडं मोठी आघाडी

चेन्नई टेस्टवर दुसऱ्याच दिवशी भारतानं पकड मिळवली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी टीम इंडियाची पहिली इनिंग 376 वर संपुष्टात आली. त्याला उत्तर देताना बांगलादेशची पहिली इनिंग फक्त 149 वर संपुष्टात आली. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 4 विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि रविंद्र जडेजा यांना प्रत्येकी 2 विकेट्स मिळाल्या.

Advertisement

( नक्की वाचा :  घरच्या मैदनावर अश्विननं घडवला इतिहास, 'हा' विक्रम करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू )

टीम इंडियाची दुसऱ्या इनिंगमध्येही सुरुवात चांगली झाली नाही. यशस्वी जैस्वाल 10 तर रोहित शर्मा 5 रन काढून आऊट झाले. दुसऱ्या दिवसाच्या अखेर भारतानं दुसऱ्या इनिंगमध्ये 3 आऊट 81 रन केले आहेत. टीम इंडियाकडं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस 308 रनची आघाडी आहे. 
 

Topics mentioned in this article