Virat Kohli : विराट कोहलीचा RCB ला नकार! व्यावसायिक करार नाकारल्याने एक्झिटच्या चर्चांना उधाण

Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधील 'किंग' अर्थात विराट कोहली आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) सोडणार असल्याच्या अफवांना सध्या सोशल मीडियावर प्रचंड जोर आला आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Virat Kohli : विराट कोहली RCB सोडणार? वाचा सत्य (फोटो - BCCI )
मुंबई:

Virat Kohli : भारतीय क्रिकेटमधील 'किंग' अर्थात विराट कोहली आता इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) सोडणार असल्याच्या अफवांना सध्या सोशल मीडियावर प्रचंड जोर आला आहे. या चर्चांना खतपाणी मिळाले आहे, कारण विराटने कथितरित्या RCB सोबतचा एक 'व्यावसायिक करार' (Commercial Contract) नाकारला आहे. मात्र, माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ (Mohammad Kaif) यांनी या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट करत, यामागचे खरे कारण उघड केले आहे.

काय आहे कारण?

विराट कोहलीने हा व्यावसायिक करार का नाकारला, याचे स्पष्टीकरण मोहम्मद कैफ यांनी एका व्हिडिओमध्ये दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, विराटने 'खेळाडूंचा करार' (Player's Contract) नाकारलेला नाही, तर हा केवळ 'व्यावसायिक करार' आहे.

मोहम्मद कैफनं दिलेल्या माहितीनुसार, RCB च्या मालकीमध्ये बदल होण्याची शक्यता: RCB फ्रँचायझीचे नवीन मालक येण्याची शक्यता आहे. नवीन मालक आल्यास त्यांच्यासोबत नव्याने वाटाघाटी (Negotiation) करण्यासाठी विराटने सध्या हा व्यावसायिक करार थांबवून ठेवला आहे. फ्रँचायझीच्या मालकी हक्कावर नियंत्रण ठेवणाऱ्या या बदलांची तो वाट पाहत आहे.

फ्रँचायझी आणि खेळाडू यांच्यात दोन करार असतात, असे कैफने स्पष्ट केले. एक खेळाडूंचा (Player's Contract) आणि दुसरा व्यावसायिक (Commercial Contract). यातील केवळ व्यावसायिक करार थांबवण्यात आला आहे, याचा खेळाडू म्हणून RCB मध्ये खेळण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

Advertisement

( नक्की वाचा : Sachin Tendulkar: 10 रुपयांचा शेअर थेट 9 हजारांवर! 'क्रिकेटचा देव'च ठरला शेअरमागचा 'खेळाडू'? कंपनीनं मौन सोडलं )
 

वचन मोडणार नाही!

विराट कोहलीने यापूर्वीच IPL मध्ये आपला पहिला आणि शेवटचा सामना बेंगळुरू फ्रँचायझीकडूनच खेळण्याचे वचन दिले आहे. "विराट कोहलीने हे वचन दिले आहे आणि तो त्यापासून मागे हटणार नाही," असे कैफ यांनी ठामपणे सांगितले.

विराटने यापूर्वीच कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, ज्यामुळे त्याच्या एकदिवसीय (ODI) भविष्याबद्दल अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत RCB सोबतचा त्याचा प्रवास चर्चेत आला आहे.

Advertisement

विराट 2008 मध्ये पहिल्या हंगामापासून RCB चा खेळाडू आहे आणि त्याने फ्रँचायझीसाठी मोठी निष्ठा दाखवली आहे. 2025 मध्येच कोहलीला RCB सोबत त्याला पहिलं विजेतेपद मिळालं. विराटचं मोठं स्वप्न यावर्षी पूर्ण झालं. 

( नक्की वाचा : Harshit Rana : ''तो स्वतःच्या बळावर खेळतोय" हर्षित राणाच्या बाजूने गंभीर मैदानात, माजी कॅप्टनला फटकारले )
 

"विराट कोहली नुकताच खेळायला लागला आहे. RCB ने आता विजेतेपद जिंकण्यास सुरुवात केली आहे," असं कैफ म्हणाले. 2025 च्या IPL मध्ये कोहलीने 650 हून अधिक धावा करत संघाला ट्रॉफी जिंकवून दिली.

त्याचा फॉर्म पाहता (T20 World Cup 2024 Final मध्ये Player of the Match, ODI World Cup 2023 मध्ये Player of the Tournament), तो सध्या कुठेही जाणार नाही आणि RCB कडूनच खेळत राहील, असा विश्वास कैफने व्यक्त केला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article