आयपीएल 2026 आता अंतिम टप्प्यात आहे. या अंतिम टप्प्यात विराट कोहली आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यात झालेला वाद चर्चेत आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यादरम्या बेंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड यांच्यात मैदानातच जोरदार 'तू-तू-मैं-मैं' झाली होती.
हा वाद इतका वाढला की, सामन्यानंतर विराटने ट्रॅव्हिस हेडशी हस्तांदोलन करण्यासही नकार दिला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पण, या वादाचे पर्यावसान आता एका नको त्या वळणावर पोहोचले असून चाहत्यांनी ट्रॅव्हिस हेडच्या कुटुंबीयांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
हेडच्या पत्नी आणि मुलीवर आक्षेपार्ह कमेंट्स
विराट कोहलीच्या चाहत्यांनी या मैदानी वादाचा राग ट्रॅव्हिस हेडची पत्नी जेसिका (Jessica Head) आणि त्यांच्या लहान मुलीवर काढला आहे. अहवालानुसार, हेड आणि जेसिकाच्या लग्नाच्या फोटोंवर जाऊन नेटीझन्सनी अत्यंत आक्षेपार्ह आणि वाईट कमेंट्स केल्या आहेत. या धक्कादायक प्रकारावर ऑस्ट्रेलियाचे वृत्तपत्र 'द ॲडव्हर्टायझर'शी बोलताना जेसिकाने आपली व्यथा मांडली.
(नक्की वाचा- Mumbai-Pune: मुंबई-पुणे अंतर आता अवघ्या दीड तासांवर! 'ग्रीनफिल्ड एक्सप्रेसवे'वरून प्रवास होणार सुसाट)
जेसिकाने म्हटलं की, "2023 च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये जेव्हा ट्रॅव्हिसने रोहित शर्माचा कॅच घेतला होता, तेव्हा जसा वाईट अनुभव आम्हाला आला होता, अगदी तसेच आता पुन्हा घडत आहे. मी सकाळी उठले तेव्हा माझे सोशल मीडिया अकाऊंट अशा कमेंट्सने भरले होते. आम्ही ठीक आहोत, पण हे लोक माझ्या मित्रांना आणि कुटुंबीयांना टार्गेट करत आहेत."
जेसिकाने पुढे खेळाडूंच्या मानसिक आरोग्याचा मुद्दा उपस्थित करत म्हटले, "सध्या सर्वच खेळांमध्ये मेंटल हेल्थ आणि आपण एकमेकांशी कसे बोलतो, यावर महत्त्वाची चर्चा सुरू आहे. खेळात आक्रमकता आणि पॅशन असणे साहजिक आहे, पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की खेळाच्या मागे एक सामान्य माणूस आणि त्याचे कुटुंब असते. अशा घटनांमधून एकमेकांबद्दल आदर आणि सपोर्ट वाढायला हवा."
विराट कोहली ट्रॅव्हिस हेडवर नेमका का भडकला होता?
बेंगळुरू आणि हैदराबादचा सामना सुरू असताना कॉमेन्ट्री करताना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने म्हटले की, विराट कोहलीलाही ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखेच आक्रमकतेने क्रिकेट खेळायला आवडते. थोडी मस्करी, थोडी शेरेबाजी आणि थोडे अॅग्रेशन त्याला आवडते. तो ट्रॅव्हिस हेडला तेच सांगत होता."
(नक्की वाचा- IPL 2026 LSG vs PBKS: लखनौमध्ये चीअरलीडर्ससोबत प्रेक्षकांचे गैरवर्तन; मैदानातील संतापजनक VIDEO आला समोर इरफानने पुढे सांगितले की, हेड जेव्हा फलंदाजी करत होता, तेव्हा विराटने त्याला गोलंदाजी करण्यासाठी उकसवले. विराटने त्याला सुनावले की, "तू काही इम्पॅक्ट प्लेयर नाहीस". सामान्यतः हेड फलंदाजी संपवून 'इम्पॅक्ट प्लेयर' म्हणून मैदानातून बाहेर जातो. विराटने त्याला मैदानातच थांबवून गोलंदाजी करण्याचे आव्हान दिले आणि त्यावरून दोघांमध्ये शब्दांची चकमक उडाली. सामन्यानंतर विराटने हात न मिळवल्याच्या घटनेवर बोलताना इरफान म्हणाला, "सामन्यानंतर जे झाले, त्यावर मी जास्त बोलणार नाही, ते टाळता आले असते. पण मैदानावर जे घडते ते क्रिकेटचा भाग आहे आणि असे घडत राहते."'तू इम्पैक्ट प्लेयर नाहीस'