Vaibhav Sooryavanshi विराट कोहलीच्या कोचचा वैभव सूर्यवंशीला सल्ला, मोजक्या शब्दात थेट आणि स्पष्टच म्हणाले की..

Vaibhav Sooryavanshi News: आयपीएलमध्ये 776 धावा करणाऱ्या 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची तुलना थेट विराट कोहलीसोबत केली जात आहे. यावर विराटच्या कोचांनी दिलेले धक्कादायक उत्तर नक्की पाहा.

जाहिरात
Read Time: 4 mins
"Vaibhav Sooryavanshi News: विराट कोहलीच्या कोचचा सूर्यवंशीला मोलाचा सल्ला"
PTI

Vaibhav Sooryavanshi News: सुपरस्टार विराट कोहलीचे कोच राजकुमार शर्मा यांनी वैभव सूर्यवंशी एक दुर्मीळ प्रतिभावान व्यक्ती असल्याचे म्हणत त्याचे कौतुक केले आहे तसेच त्याला आपल्या खेळात कोणताही बदल न करण्याचा सल्लाही दिला आहे. (Rajkumar Sharma Praises Vaibhav Sooryavanshi)

15 वर्षीय खेळाडूची ऑरेंज कॅप आणि टीम इंडियात निवडीची चर्चा | 15 Year Old Players Orange Cap and Team India Selection Buzz

15 वर्षीय खेळाडू वैभव सूर्यवंशीसाठी इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) हा सीझन शानदार राहिला. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने तब्बल 776 धावा केल्या आणि तो या टुर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू (ऑरेंज कॅप विजेता) ठरला. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याच्या इंडियन क्रिकेट टीममध्ये प्रवेश होण्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे.

Advertisement

जागतिक दर्जाच्या बोलर्सविरुद्ध वैभवची उल्लेखनीय कामगिरी | Vaibhavs Remarkable Performance Against World Class Bowlers

राजकुमार शर्मा यांनी पीटीआयशी (PTI) बोलताना सांगितले, "निःसंशयपणे तो (वैभव सूर्यवंशी) एक असामान्य प्रतिभावान व्यक्ती आहे. या आयपीएलमध्ये तो ज्या पद्धतीने खेळला, ते उल्लेखनीय आहे. ज्या प्रकारे त्याने सर्व प्रथम श्रेणी, आंतरराष्ट्रीय आणि जागतिक दर्जाच्या बोलर्सची धुलाई केलीय ते कौतुकास्पद आहे. मला आवर्जून सांगावेसे वाटते की तो एक विशेष प्रतिभावान खेळाडू आहे. वैभव खूपच उत्कृष्ट खेळतो."

टी20 क्रिकेटसाठी वैभव सूर्यवंशीचा निर्भीड खेळ | Vaibhav Suryavanshis Fearless Game for T20 Cricket

ते पुढे म्हणाले, "तो ज्या प्रकारचा निर्भीडपणे क्रिकेट खेळतो आणि ज्या प्रकारे त्याने जागतिक दर्जाच्या बोलर्सची धुलाई केलीय, ते वाखाणण्याजोगे आहे. त्याने ज्या पद्धतीने सिक्स ठोकले आहेत, ते अद्भुत आहे. टी20 क्रिकेटसाठी तो एक शानदार खेळाडू आहे."

(नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi चा नवा VIDEO व्हायरल! IPL 2026नंतर पुन्हा चर्चेत, कोट्यवधी रुपये कमावतो, पण घर पाहिलं का?)

कोच राजकुमार शर्मा यांचा खास सल्ला | Coach Rajkumar Sharmas Advice to Maintain Natural Game

जेव्हा शर्मा यांना विचारण्यात आले की, एक कोच म्हणून ते वैभवला काय सल्ला देतील? तेव्हा ते म्हणाले की, "तो टी20 खेळत आहे, त्यामुळे मी म्हणेन की त्याने काहीही बदलू नये. जसा खेळत आहेस, तसाच खेळत राहा."

Advertisement

टेस्ट क्रिकेट आणि मॅच्युरिटीबाबत राजकुमार शर्मांचे मत| Rajkumar Sharmas Take on Test Cricket and Maturity

शर्मा पुढे असेही म्हणाले की, "तू जबरदस्त क्रिकेट खेळत आहेस आणि लोकांचे मनोरंजन करत राहा. जिथपर्यंत टेस्ट (Test) क्रिकेट खेळण्याचा प्रश्न आहे, मी त्याला या फॉरमॅटमध्ये जास्त पाहिलेले नाही. त्यामुळे तो किती परिपक्व आहे, तो आपला खेळ कसा बदलू शकतो किंवा तो स्विंग बॉलिंग कशी खेळू शकतो, याबद्दल मी आता सांगू शकत नाही. पण सध्या तरी माझी हीच इच्छा आहे की, तो ज्या पद्धतीने खेळत आहे, तोच खेळ त्याने पुढेही सुरू ठेवावा."

विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील तुलना | Comparison Between Virat Kohli and Vaibhav Suryavanshi

जेव्हा त्यांना त्यांचा शिष्य विराट कोहली 15 वर्षांचा असताना जसा खेळायचा, त्याची तुलना सूर्यवंशीसोबत करण्याबाबत विचारले, तेव्हा ते म्हणाले, "माझा लोकांची तुलना करण्यावर विश्वास नाही. विराटने गेल्या 18 वर्षांत जे काही केले आहे, तो एक खूप मोठा काळ आहे, ज्यामध्ये त्याने सातत्य राखले आहे."

Advertisement

मोठ्या फॉरमॅटमधील खेळाबाबत राजकुमार शर्मा यांचे विश्लेषण| Rajkumar Sharmas Analysis on Performance in Longer Formats

ते पुढे म्हणाले, "पण वैभवला पाहून असे वाटते की तो खूप प्रतिभावान मुलगा आहे. पण आपण त्याला फक्त याच एका फॉरमॅटमध्ये खेळताना पाहिले आहे. आपण त्याला अजून मोठ्या फॉरमॅटमध्ये खेळताना पाहिलेले नाही."

विराट कोहलीचे मोठेपण आणि वैभव एक उगवता तारा | Virat Kohlis Greatness and Vaibhav as a Rising Star

शर्मा यांनी स्पष्ट केले की, "विराट एक वेगळा खेळाडू आहे. तो आता एक महान खेळाडू बनला आहे आणि हे त्याने भारताला अनेक सामने जिंकवून देऊन सिद्ध केले आहे. भारतासाठी विराटने जेवढे सामने जिंकले आहेत, तेवढे इतर कोणत्याही भारतीय खेळाडूने जिंकलेले नाहीत आणि याच कारणामुळे त्याच्यावर इतके प्रेम केले जाते. येथे आपण एका उगवत्या ताऱ्याला (सूर्यवंशी) पाहत आहोत आणि त्याला पुढे जाताना पाहणे आम्हाला नक्कीच आवडेल."

वैभव सूर्यवंशीच्या फिटनेसबाबत राजकुमार शर्मा यांचे वक्तव्य| Rajkumar Sharmas Statement on Vaibhav Suryavanshis Fitness

सूर्यवंशीच्या फिटनेसवर बोलताना ते म्हणाले, "फिटनेस तर येऊन जाईल, तो अजून लहान मुलगा आहे."

(Content PTI)