जाहिरात

Vaibhav Suryavanshi चा नवा VIDEO व्हायरल! IPL 2026नंतर पुन्हा चर्चेत, कोट्यवधी रुपये कमावतो, पण घर पाहिलं का?

IPL 2026 संपल्यानंतरही राजस्थान रॉयल्सचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत आहे. त्याची खाण्याची आवड आणि साधेपणा याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा.

Vaibhav Suryavanshi चा नवा VIDEO व्हायरल! IPL 2026नंतर पुन्हा चर्चेत, कोट्यवधी रुपये कमावतो, पण घर पाहिलं का?
"Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या चीट मीलने वेधले सर्वांचे लक्ष"

आयपीएल 2026चा सीझन संपला असला तरीही लोकांमध्ये राजस्थान रॉयल्सचा खेळाडू वैभव सूर्यवंशीची क्रेझ कमी होण्याचे नाव घेत नाहीय. त्याच्या चाहत्यांसाठी एक नवी अपडेट आहे, तुमचा लाडका खेळाडू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पण यावेळी त्याच्या चर्चेत येण्याचे कारण त्याची बॅट नसून त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी (Food Choices) आहेत. ESPN Cricinfo ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंड करत आहे.

"मी सर्वकाही खातो, मला घरचं जेवण खूप आवडतं. पण चीट मीलमध्ये (Cheat Meal) मला आईस्क्रीम खायला जास्त आवडते"

येथे पाहा व्हिडीओ
 

"घरी असताना मी कार्टुन पाहायचो आणि आजही पाहतो. जेव्हा मला थोडे रिलॅक्स व्हायचे असते, तेव्हा मी रूममध्ये बसून कार्टुन्स पाहतो. यामुळे खूप छान वाटते आणि घराची आठवणही येते."

(नक्की वाचा: Next Team India T20 Captain: सूर्यकुमारनंतर टीम इंडियाचा नवा टी-20 कर्णधार कोण? ही पाच नावे चर्चेत)

वैभवची हटके स्टाइल

सूट-बुटापासून ते स्कार्फपर्यंत, वैभवची स्टाइलही एकदम कडक आहे. वैभव घरी जितका साधा आणि आरामदायक मूडमध्ये राहतो, एखाद्या इव्हेंटमध्ये तो तितकाच प्रोफेशनल दिसतो. फॉर्मल आऊटफिट्ससोबतचा त्याचा आत्मविश्वासामुळे त्याचा लुक अधिकच खास बनवतो. हेच कारण आहे की क्रिकेटव्यतिरिक्त त्याचा फॅशन सेन्सही चाहत्यांमध्ये नेहमी चर्चेचा विषय असतो.

वैभव सूर्यवंशीचं घर कसं आहे?

आयपीएलची कोट्यवधी रुपयांची डील आणि देशभरात ओळख मिळूनही वैभवचे घर एखाद्या आलिशान महालासारखे नसून एका सर्वसामान्य कुटुंबाच्या घरासारखेच आहे. हाच साधेपणा त्याला इतर तरुण स्टार्सपेक्षा वेगळा ठरवतो. या फोटोंकडे पाहून असे वाटते की, त्यांच्या घरचे वातावरण अगदी तसेच आहे जसे देशातील लाखो मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये पाहायला मिळते. याच कारणामुळे त्याची यशाची कहाणी लोकांना आपलेपणाची जाणीव करून देते.

(नक्की वाचा : Suryakumar Yadav: भारताच्या टी-20 संघाच्या कर्णधार पदावरून सूर्यकुमार यादवची हकालपट्टी? क्रिकेट करिअरचा द एंड?)

आयपीएलमध्ये नाव कमावल्यानंतर आणि प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतरही वैभवचे आपल्या मातीशी असलेले नाते कायम आहे. त्याचे घर या गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे की, मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठ्या शहराची किंवा आलिशान वातावरणाची गरज नसते, तर फक्त मेहनत आणि चिकाटीची गरज असते. कदाचित म्हणूनच आज लाखो तरुण त्याच्या या प्रवासातून प्रेरणा घेत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com