साल 1991 चं होतं. भारत आणि पाकिस्तान यांची क्रिकेट मालिका भारतात होत होती. पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला होता. या मालिकेतील एक सामना मुंबईत वानखेडे स्टेडीअमवर होणार होता. मात्र या सामन्याला शिवसेनेचा विरोध होता. पाकिस्तान भारत विरोधी दहशतवादी कारवाया जोपर्यंत बंद करत नाही तोपर्यंत त्यांना भारतात खेळू देणार नाही अशी भूमीका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. 1991 सालात शिवसेनेची प्रचंड ताकद होती. मुंबई बाळासाहेबांच्या एका शब्दावर थांबत होती. इतका प्रचंड वचक बाळासाहेब आणि शिवसेनेचा मुंबईत होता. अशा स्थितीत पाकिस्तानला भारतात खेळू न देण्याचा इशारा बाळासाहेबांनी दिला होता. शेवटी बाळासाहेबांचा हा शब्द शिवसैनिकांनी खरा करून दाखवला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. मुंबईतल्या वानखेडे स्टेडीअममध्ये खेळणं हे प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. अनेक ऐतिहासिक सामन्यांचं साक्षिदार हे स्टेडिअम आहे. त्या पैकीच एक घटना ज्या मुळे वानखेडे स्टेडीअम नेहमीच लक्षात राहीलं आहे. ते म्हणजे शिवसैनिकांनी उधळवून लावलेला भारत पाकिस्तानचा सामना. 1991 साली भारत आणि पाकिस्तान यांच्यात भारतात मालिका होणार होती. त्यातील एक सामना हा वानखेडे स्टेडीअम होणार होता. त्याला बाळासाहेबा ठाकरे यांनी विरोध केला होता. 19 ऑक्टोबर 1991 ला बाळासाहेबांनी एक स्टेटमेंट दिले होते. त्यानुसार त्यांनी पाकिस्तानला भारतात आणि मुंबईत खेळण्यास विरोध केला होता.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सामन्याला विरोध केला होता. पण तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी मात्र या सामना काही झालं तरी होणार असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे शिवसैनिक हा सामना उधळण्याचा प्रयत्न करतील या पार्श्वभूमीवर वानखेडेला पोलिस छावणीचं रूप आलं होतं. त्यामुळे स्टेडिअममध्ये मुंगी ही घुसू शकत नव्हती अशी स्थिती होती. अशा स्थितीत त्यावेळीचे शिवसैनिक शिशीर शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सामना न होवू देण्याचा विडा उचलला होता. त्यांनी सामन्याच्या तीन दिवस आधी वानखेडे स्टेडीअमची रेकी केली होती. स्टेडीअममध्ये कसं घुसता येईल याचा ही प्लॅन त्यांनी केला होता.
( नक्की वाचा : सचिन तेंडुलकरच्या 51 अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? )
शिशिर शिंदे सांगतात की आम्ही सात ते आठ शिवसैनिक एकत्र जमलो. त्यानंतर आम्ही एक टेम्पो केला. त्यात कुदळ पावडा टाकला. शिवाय ऑईलचे कॅनही बरोबर घेतले. तो ट्रेम्पो घेवून ते वानखेडे स्टेडीअमच्या गेटवर गेले. आम्ही कर्मचारी आहोत असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांना स्टेडीअममध्ये सोडण्यात आलं. आतमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर काही न पाहाता सर्व शिवसैनिक खेळपट्टीवर धावत गेले. कोणाला काही समजण्या आत खेळपट्टी पर्यंत ते पोहोचले. त्यानंतर कुदळ फावड्यांने संपुर्ण खेळपट्टी खोदून टाकली. ती परत तयार करता येवू नये यासाठी त्यावर ऑईल ओतले. त्यामुळे संपुर्ण खेळपट्टी खराब झाली. शिशिर शिंदे आणि त्यांचे सहकारी तिथून निसटले. शिशिर शिंदे हा प्रसंग सांगतात.
तिथून बाहेर गेल्यानंतर सर्वात आधी शिशिर शिंदे यांनी एका पीसीओवरून थेट मातोश्रीवर फोन केला. फोन थेट बाळासाहेब ठाकरे यांना करण्यात आला होता. बाळासाहेबांना शिशिर शिंदे यांनी वानखेडेची खेळपट्टी आपण उखडली असल्याचं सांगितलं त्यानंतर बाळासाहेबांनी शिशिर शिंदे आणि अन्य शिवसैनिकांनी शाबासकी दिली असं शिशिर शिंदे सांगतात. त्यानंतर ज्या वेळी शिवसैनिकांनी खेळपट्टी खोदली आहे, हे समजल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांची धावपळ झाली. सरकारची नाचक्की झाली. ऐवढा पोलिस बंदोबस्त असूनही शिवसैनिकांनी हा कारनामा करून दाखवला होता.
( नक्की वाचा : मित्र असावा तर असा... सचिन तेंडुलकरनं घेतली विनोद कांबळीची भेट ! Video पाहून फॅन्स इमोशनल )
ऐवढेच नाही तर खेळपट्टी पुर्ण पणे खराब झाली होती. तातडीने ती तयार ही करता येणार नव्हती. त्यामुळे सामना तिथे होणं शक्यच नव्हतं. अशा स्थिती तो सामना रद्द करण्यात आला. विशेष म्हणजे त्यानंतर मुंबईत कधीही भारत विरुद्ध पाकिस्तान हा समना झाला नाही. शिवसैनिकांनी दिल्ली आणि मोहालीमध्ये ही अशा पद्धतीने विरोध केला होता. पण मुंबई वानखेडे स्टेडीअमवर जे काही शिवसैनिकांनी केले त्याची चर्चा संपुर्ण जगात झाली होती. पाकिस्तानच्या संघानेही त्याचा धसका घेतला होता. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात ही घटना अजरामर झाली.