जाहिरात

Sara Tendulkar 'माझं हृदय आता तुझ्याकडे सुरक्षित'; अर्जुनच्या लग्नात सारा तेंडुलकरने वहिनीकडे मागितलं एकच वचन!

Arjun Tendulkar Sania Chandok Wedding: भावाच्या लग्नात बोलताना सारा हळवी झाली होती. सारानं यावेळी तिच्या मनातील गुपितच सर्वांसमोर उघड केले.

Sara Tendulkar 'माझं हृदय आता तुझ्याकडे सुरक्षित'; अर्जुनच्या लग्नात सारा तेंडुलकरने वहिनीकडे मागितलं एकच वचन!
Sara Tendulkar Video : सारा तेंडुलकरचा इमोशनल व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
मुंबई:

Arjun Tendulkar Sania Chandok Wedding:  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचं  सानिया चंदोकशी नुकतंच लग्न झालंय. अर्जुनची बहीण साराचा या लग्नातील एक खास व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. सारानं केलेल्या भावूक भाषणाचा हा व्हिडिओ आहे. भावाच्या लग्नात बोलताना सारा हळवी झाली होती. सारानं यावेळी तिच्या मनातील गुपितच सर्वांसमोर उघड केले. अर्जुन माझा जीव आहे, पण आता तो तुझा झालाय, असे म्हणत साराने आपल्या वहिनीला एक खास विनंती केली आहे.

वहिनी नाही तर मानली सख्खी बहीण

अर्जुन आणि सानियाच्या या विवाहसोहळ्यात साराने सानियासाठी एक अतिशय हृदयस्पर्शी संदेश दिला. सारा म्हणाली की, सानिया, तू ती बहीण आहेस जी मला नेहमीच हवी होती पण माझ्याकडे नव्हती. 

आपल्या दोघांमधील नाते हे केवळ नणंद-वहिनीचे नसून त्याही पलीकडचे आहे. तू खऱ्या अर्थाने माझ्यासाठी माझ्या सख्ख्या बहिणीसारखीच आहेस. साराच्या या बोलण्यानं उपस्थितांची मने जिंकली असून तेंडुलकर कुटुंबातील हे आपुलकीचे नाते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

( नक्की वाचा : Suryakuamar Yadav :'मी त्याची माफी मागितली'; टी-20 वर्ल्ड कपमधील त्या मोठ्या चुकीवर सूर्याने अखेर सोडलं मौन )

कुटुंबाचा जुना आणि अविभाज्य भाग

सानियाचे या घरात होणारे स्वागत हे केवळ औपचारिक नसून ते खूप जुने आहे. साराने तिच्या भाषणात आई अंजली तेंडुलकर यांच्या एका वाक्याचा उल्लेख केला. आई म्हणाली होती की, सानिया मी तुझे या कुटुंबात स्वागत करू शकत नाही, कारण तू गेल्या अनेक वर्षांपासून आधीच या कुटुंबाचा एक भाग आहेस. 

सानियाचे तेंडुलकर कुटुंबाशी असलेले जुने ऋणानुबंध पाहता, तिचे या घरातील आगमन सर्वांसाठीच अत्यंत सहज आणि आनंदाचे ठरले आहे. प्रत्येकाचे तिच्यावर असलेले प्रेम पाहता तिचा पुढील प्रवास अत्यंत सुखकर असेल, असा विश्वास साराने व्यक्त केला.

( नक्की वाचा : Arjun Tendulkar wedding: मास्टर ब्लास्टरच्या घरी येणार सून, पण त्याचे होणारे व्याही काय करतात? वाचा सविस्तर )

हृदयाचा तुकडा आता सानियाच्या स्वाधीन

या संपूर्ण सोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण तो होता, जेव्हा सारा आपल्या भावाबद्दल म्हणजेच अर्जुनबद्दल बोलू लागली. सारा म्हणाली की, मी अर्जुनच्या साखरपुड्याच्या वेळीही सांगितले होते की, माझा भाऊ हाच माझे संपूर्ण हृदय आहे. पण सानिया, आता माझे हे हृदय तुझ्या मालकीचे झाले आहे. त्यामुळे आता तूच त्याची काळजी घे, त्याच्यावर भरभरून प्रेम कर आणि त्याला जप. 

मला खात्री आहे की अर्जुनही तुझ्यावर तितकेच प्रेम करेल. साराच्या या शब्दांनी लग्नमंडपात एक वेगळीच शांतता आणि भावूक वातावरण निर्माण झाले होते.

दोघांच्या सुखी संसारासाठी भरभरून शुभेच्छा

साराने आपल्या भाषणाचा शेवट या नवदाम्पत्याला शुभेच्छा देऊन केला. अर्जुन आणि सानिया, तुमच्या दोघांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, आनंद आणि जगातील सर्व चांगले ऐश्वर्य लाभो, अशी इच्छा तिने व्यक्त केली. मैत्रीच्या धाग्याने विणलेले हे नाते आता लग्नाच्या बंधनात अडकले असून, तेंडुलकर कुटुंबात एका नवीन आणि आनंदी पर्वाची सुरुवात झाली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com