Only Fan Page मुळे चर्चा, मेडल जिंकताच Video व्हायरल! कोण आहे ती खेळाडू?

Alysha Newman : एलिसा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकल्यानंतर तिनं केलेल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
A
मुंबई:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जगभरातील खेळाडूंनी त्यांचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करत पदकांची लयलूट केली. अनेक विक्रम रचले, काही जणांचं स्वप्न भंगलं, काही जणांनी समाधानानं तर काहींनी व्यथित मनानं आपलं सर्वस्व असलेल्या क्रीडा प्रकाराला निरोप दिला. या संपूर्ण ऑलिम्पिकमध्ये काही खेळाडूंची चांगलीच चर्चा झाली. कॅनडाची ब्रॉन्झ मेडल विजेती खेळाडू एलिसा न्यूमॅन (Alysha Newman ) देखील सध्या चांगलीच चर्चेत आहे.

कॅनडाच्या एलिसानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पॉल व्होल्ट स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल जिंकलं. एलिसानं 4.85 मीटर लांब उडी पूर्ण करत हे मेडल जिंकलं. ऑलिम्पिकमधील या प्रकारात मेडल मिळवणारी ती कॅनडाची पहिली महिला खेळाडू आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एलिसा तिच्या मैदानातील कामगिरीपेक्षा पदक जिंकल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत आहे. एलिसानं मेडल जिंकल्यानंतर कंबर आणि पार्श्वभाग हलवून सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झालाय. भर मैदानात केलेल्या या सेलिब्रेशनमुळे तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

'Only Fan' या प्रौढांसाठी असलेल्या साईटवर एलिसाचं पेज आहे. एलिसानं स्वत:च ही माहिती उघड केलीय. तिच्या सेलिब्रेशनचा अर्थ तिच्या या पेजशी जोडण्यात येतोय. या सर्व टिकेलाही एलिसानं उत्तर दिलंय.

Advertisement


काय म्हणाली एलिसा?

'मला माझ्या कोचची मस्करी करायची होती. मी कायम दुखापतग्रस्त असते. मला पुन्हा दुखापत होईल, अशी त्यांना भीती होती. त्यामुळे मी त्यांचं दडपण दूर करण्यासाठी या प्रकराचे सेलिब्रेशन केलं. या प्रकारचं सेलिब्रेशन करण्याचा विचार मी केला नव्हता. पण, ते सहज घडलं,' असं एलिसानं सांगितलं.  

कुणाला बदलू शकत नाही

एलिसानं जर्मन पब्लिकेशन BLID ला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिच्या ओन्ली फॅन्स अकाऊंटबद्दलही स्पष्टीकरण दिलं आहे. एलिसाचे ओन्ली फॅन्सवर अनेक फॉलोअर्स आहेत. गेल्या काही दिवसामध्ये तिच्या लोकप्रियतेमध्येही वाढ झाली आहे. 'लोकांना ओन्ली फॅन्सबाबत समजतं तेंव्हा त्यांच्या डोक्यात काही गोष्टी सुरु होतात. हे उघज आहे. मी कुणाच्या मनात काय चाललंय हे बदलू शकत नाही,' असं एलिसानं स्पष्ट केलं. 

( नक्की वाचा : तरुणांमध्ये वाढत असलेला Boysober रिलेशनशिप ट्रेंड काय आहे? यामध्ये मुलं-मुली काय करतात? )

एलिसानं तिच्या सब्सक्रायबर्सला दिलेलं वचन पूर्ण केलं आहे. 'मी करुन दाखवलंय. मी ब्रॉन्झ मेडलसह घरी जात आहे. हे सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे,' अशी भावना एलिसानं मेडल जिंकल्यानंतर व्यक्त केली. 

Advertisement

एलिसाच्या मोठ्या कमाईचं माध्यम

एलिसा तिच्या ओन्ली फॅन्स अकाऊंटवर तिच्या ट्रेनिंगचे सर्व व्हिडिओ शेअर करते. तिच्या पेजवर जाण्याची किंमत 7.14 डॉलर आहे. तर तिचं महिन्याचं सब्सक्रिप्शन 12.99 डॉलर आहे. 'मी जे पोस्ट करते त्यामधून पैसा कमावते. तुम्हाला ते माहिती करण्यासाठी पेजवर लॉग इन करावे लागेल. या वेबसाईटमुळे मला माझ्या फॅन्सच्या संपर्कात राहता येते. माझ्या आत्मविश्वासात त्यामुळे भर पडते,' असं एलिसानं सांगितलं.

Only Fans काय आहे?

ओन्ली फॅन्स हा 2016 साली सुरु झालेला ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. प्रौढांसाठी (वय वर्ष 18 पूर्ण ) असलेला हा प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये युझर्सना फोटो, व्हिडिओ आणि लाईव्ह स्ट्रिम पाहण्यासाठी पैसे मोजावे लागतात. YouTubers, फिटनेस ट्रेनर, मॉडेल या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. प्रौढ कंटेट निर्मात्यांमध्येही हा प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहे. 

Advertisement

( ट्रेंडिंग बातमी : अमन सेहरावतनं ब्रॉन्झ मेडल मॅचपूर्वी 10 तासांमध्ये 4.6 किलो वजन कसं कमी केलं? )