जाहिरात

Aman Sehrawat : अमन सेहरावतनं ब्रॉन्झ मेडल मॅचपूर्वी 10 तासांमध्ये 4.6 किलो वजन कसं कमी केलं?

Aman Sehrawat Weight Loss Story :  ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळण्यासाठी अमन सेहरावतला 10 तासांमध्ये 4.5 किलो वजन कमी करण्याची गरज होती.

Aman Sehrawat : अमन सेहरावतनं ब्रॉन्झ मेडल मॅचपूर्वी 10 तासांमध्ये 4.6 किलो वजन कसं कमी केलं?
Aman Sehrawat
मुंबई:

Aman Sehrawat Weight Loss Story :  भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आहे. अमननं शुक्रवारी झालेल्या मॅचमध्ये प्यूर्टो रिकोच्या डारियन टोई क्रूजचा 13-5 असा पराभव केला. 21 वर्षांचा अमन ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात वैयक्तिक मेडल मिळवणारा सर्वात तरुण भारतीय आहे. त्याचबरोबर 2008 पासून प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये मेडल जिंकण्याची भारतीय परंपरा अमननं कायम ठेवली आहे. अमनचा हा प्रवास इतका सोपा नव्हता.

10 तासांची परीक्षा

काही मिळवण्यासाठी काही गमावण्याची गरज आहे, हे भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतला चांगलं माहिती होतं. गुरुवारी झालेल्या सेमी फायनल मॅचमध्ये अमनचा पराभव झाला. त्यावेळी त्याचं वजन 61.5 किलो होतं. या पराभवानंतरही अमनपुढचं आव्हान संपलेलं नव्हतं. 57 किलो वजनी गटातील ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळण्याासाठी त्याला 10 तासांमध्ये 4.5 किलो वजन कमी करण्याची गरज होती. 

अमनं दुसऱ्या दिवशी सकाळी वजन यंत्रावर त्याचं वजन तपासलं, त्यावेळी त्यानं कोच जगमंदर सिंह आणि विरेंद्र दहिया यांच्यासोबत केलेल्या कष्टाचा चीज झालं होतं. अमननं तब्बल 4.6 किलो वजन कमी केलं. तो 56.9 किलो ग्रॅम वजनासह ब्रॉन्झ मेडलची मॅच खेळण्यासाठी पात्र झाला.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अमनचं वजन हे आवश्यक मर्यादेपेक्षा बरोबर 100 ग्रॅम कमी होतं. विनेश फोगाटला 100 ग्रॅम वजन जास्त भरल्यानंच गोल्ड मेडल मॅच खेळण्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आलं होतं. त्यापाठोपाठ पुन्हा एकदा तसाच प्रकार टाळण्यात भारतीय टीमला यश आलं.

कसं केलं वजन कमी?

जपानच्या हिगुआची रेईनं गुरुवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.30 वाजता झालेल्या सेमी फायनलमध्ये अमनचा पराभव केला. त्यानंतर एक क्षणही वाया न घालवता भारतीय टीम कामाला लागली. 
अमन त्याच्या दोन सिनिअर कोचसोबत दीड तास मॅटवर कुस्ती खेळला. अमनला कोचनं कुस्तीमध्ये चांगलंच दमवलं. त्यानंतर दीड तास हॉट बाथ सेशन झालं. 

रात्री 12.30 वाजता अमन जिममध्ये दाखल झाला. तिथं त्यानं नॉन स्टॉप एक तास ट्रेडमिलवर घाम गाळला. वजन कमी करण्यासाठी त्याला या व्यायामाचा चांगलाच उपयोग झाला. या सेशननंतर अमनला 30 मिनिटांचा ब्रेक देण्यात आला. ब्रेकनंतर त्याची सॉना बाथच्या 5 मिनिटांची 5 सेशन झाली. 

( ट्रेंडिंग बातमी : Vinod Kambli : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी पहिल्यांदा दिसला, तब्येतीबाबत म्हणाला... )
 

सॉन बाथच्या शेवटच्या सेशननंतरही अमनचे वजन 900 ग्रॅम जास्त होते. त्यानंतर प्रशिक्षकांनी त्याला हलका व्यायाम करण्यास सांगितला. हा व्यायाम संपल्यानंतर अमननं 15 मिनिटं धावण्याचे पाच सेशन केले. या सर्व प्रयत्नानंतर पहाटे साडेचार वाजता त्याचं वजन 56.9 किलो भरलं. आवश्यक मर्यादेपेक्षा ते 100 ग्रॅम कमी होतं. हे वजन पाहून अमन आणि त्याच्या प्रशिक्षकांनी सुटकेचा निश्वास सोडला. 

या सत्राच्या दरम्यान अमनला कोमट पाण्यात लिंबू, मध तसंच थोडी कॉफी देण्यात आली. अमन त्यानंतरही झोपला नाही. 'आम्ही दर तासाला अमनचे वजन तपासत होतो. आम्ही संपूर्ण रात्र आणि दिवसाही झोपलो नाही, असं त्याचे कोच दहिया यांनी सांगितलं. 

( नक्की वाचा : Neeraj Chopra : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्रानं पटकावलं सिल्व्हर मेडल! )
 

'वजन कमी करणे ही सामान्य गोष्ट आहे. पण, आदल्या दिवशी (विनेश फोगाट प्रकरण) जे घडलं त्यामुळे आमच्यावर प्रचंड दडपण होतं. आम्हाला आणखी एक मेडल गमावयचं नव्हतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

या सर्व कष्टामुळेच अमन सेहरावत शुक्रवारी सेमी फायनलला खेळण्यासाठी उतरला. त्यानं ती मॅच जिंकत भारतचा सर्वात तरुण पदकविजेता होण्याचा विक्रम केला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com