Palash Muchhal Smriti Mandhana : कोण आहे नंदिका द्विवेदी? लग्नापूर्वी या मुलीसोबत पलाश मुच्छलला रंगेहात पकडलं?

पलाशने मानधनाला धोका दिला, त्याचं नंदिका द्विवेदी नावाच्या कोरिओग्राफरसोबत अफेअर होतं; असा दावा केला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Palash Muchhal Smriti Mandhana cheating case : भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल २३ नोव्हेंबरला लग्नबंधनात अडकणार होते, मात्र मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्याने हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं. लग्नाबाबत मानधनाचे बिझनेस मॅनेजर तुहिन मिश्रा यांच्याकडून एक अधिकृत निवेदन जारी केलं होतं. मात्र सोशल मीडियावर लग्नाबाबत अनेक थिएरी रचल्या जात आहेत. 

लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मानधनाने आपल्या सोशल मीडिया प्री वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले. केवळ मानधनाच नाही तर तिच्या मित्र-मैत्रिणींनीही सोशल मीडियावरुन प्री-वेडिंग कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ डिलिट केले. 

पलाशने मानधनाला धोका दिला?

सोशल मीडियावरुन फोटो हटवल्यानंतर रेडिटवर दावा केला होता की, पलाशने मानधनाला धोका दिला. त्याचं एका कोरिओग्राफरसोबत अफेअर होतं. ज्याबाबत मानधनाला संगीत कार्यक्रमाच्या रात्री कळालं. पलाश आणि मॅरीचे चॅट सोशल मीडियावर व्हायरल झाले. यातून चर्चांना उधाण आलं. आता या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. रेडिटवर एका पोस्टमध्ये दावा करण्यात आलाय की, संगीत कार्यक्रमाच्या रात्री मानधनाची मैत्रिण श्रेयंक पाटील हिने पलाशला कोरिओग्राफरसोबत रंगेहाथ पकडलं होतं. ज्यानंतर लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्या मुलीचं नाव नंदिका द्विवेदी असल्याचं सांगण्यात आलं आहे. 

कोण आहे नंदिका द्विवेदी? l Who is Nandika Dwivedi?

मीडिया रिपोट्सनुसार, नंदिका एक कोरिओग्राफर आहे. नंदिकाने दिल्ली विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि सध्या ती मुंबईत कोरिओग्राफर म्हणून काम करीत आहे. नंदिकाने अनेक म्युझिक व्हिडिओसाठी कोरिओग्राफी केली आहे. त्यांच्या इन्स्टाग्राम बायोनुसार, नंदिका एक पर्सनल ट्रेनर आणि कोरिओग्राफर आहे. नंदिकादेखील पलाश आणि मानधनाच्या लग्नासाठी सांगलीत आली होती. पलाश मुच्छलला लग्नाच्या कार्यक्रमातील डान्स शिकविण्यासाठी ती सांगलीला आल्याचं सांगितलं जात आहे. तिने जॅकलीन फर्नांडिस आणि शिखर धवनचं हिट गाणं 'बेसोस'मध्येही काम केलं होतं. याशिवाय तिने मनसिमरनचा म्युझिक व्हिडिओ तेरे पिछे मध्ये मुख्य भूमिकेत झळकली होती. नंदिकाचा इन्स्टाग्राम प्रायव्हेट आहे आणि सोशल मीडियावरील दाव्यांशिवाय पलाशसोबत नंदिकाचं कोणतंही कनेक्शन अद्याप सापडलेलं नाही. 

Advertisement

नक्की वाचा -  Smriti Mandhana : स्मृती मानधनाचा खळबळजनक निर्णय! इन्स्टाग्राम अकाऊंट पाहून चाहत्यांना बसला धक्का!

पलाशने स्मृती मानधनाला धोका दिला होता का? लग्न पुढे ढकलण्यासाठी नंदिका द्विवेदी कारणीभूत आहे का? दोघांमधील वादाचं कारण काय? यांसारख्या प्रश्नावर अद्याप पलाश किंवा स्मृती दोन्ही कुटुंबाकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.