Smriti Mandhan's big decision : भारतीय महिला क्रिकेट टीमची उपकर्णधार स्मृती मानधना हिला लग्नाच्या दिवशी मोठा धक्का बसला आहे. स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना लग्नाच्या काही तासांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याच्या काही तासात होणारा पती पलाश मुच्छलची तब्येत बिघडली आणि त्यानंतर त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
स्मृती मानधनाचं मोठं पाऊल...
स्मृती मानधना वडिलांच्या खूप जवळ आहे. वडिलांची प्रकृती स्थिर होत नाही तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय स्मृतीने घेतला होता. ही बाब समोर येत नाही तोच मोठी बातमी समोर आली आहे. स्मृती मानधनाचं लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे. स्मृतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील लग्न आणि साखरपुड्यासंबंधित सर्व फोटो डिटिल केले आहेत. स्मृतीने असं का केलं, याबाबत नेमकी माहिती कळू शकलेली नाही. स्मृतीचं लग्न पुढे ढकललं अशी माहिती येत असताना तिने पलाशसोबतचे साखरपुडा, संगीत आणि लग्नासंबंधितचे फोटो डिलिट केल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
नक्की वाचा - Smriti Mandhana : स्मृती मानधनाला आणखी एक धक्का; वडिलांनंतर पलाशचीही प्रकृती बिघडली, रुग्णालयात केलं दाखल
इन्स्टाग्रामवरुन साखरपुडा आणि मेंदीच्या आठवडी केल्या डिलिट
वडिलांची गंभीर अवस्थेमुळे दु:खी झालेल्या स्मृती मानधनाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. लग्न पुढे ढकलल्याच्या घोषणेसह स्मृतीने इन्स्टाग्रामवरील साखरपुड्याचे रील डिलिट केले आहे. लगे रहो मुन्ना भाई या गाण्यावर मजेशीर अंदाजात तिने साखरपुड्याचं वृत्त चाहत्यांसोबत शेअर केलं होतं.

चाहत्यांना विश्वास बसेना...
या व्हिडिओमध्ये स्मृती मानधना टीममधील खेळाडू जेमिमा रोड्रिग्स, श्रेयंका पाटील आणि राधा यादव दिसल्या होत्या. स्मृतीने लग्नाच्या सर्व आठवणी डिलिट केल्याने चाहते हैराण झाले आहेत. स्मृतीने पोस्ट डिलिट केले की हाइड हे अद्याप कळू शकलेलं नाही. दुसरीकडे पलाश मुच्छलने २१ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईच्या डी व्हाय पाटील स्टेडियममध्ये स्मृतीला प्रपोज करण्याचा व्हिडिओ शेअर केला होता, तो अद्याप अकाऊंटवर दिसत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
