IND vs BAN : चेन्नईच्या स्पिन फ्रेंडली पिचवर फास्ट बॉलर्स का ठरतायत यशस्वी? एका बदलाचा परिणाम

India vs Bangladesh, Chennai Test : चेन्नई टेस्टमध्ये पहिल्या दोन दिवसात दोन्ही टीमच्या मिळून 23 विकेट्स पडल्या आहेत. या 23 पैकी 19 विकेट्स फास्ट बॉलर्सनी घेतल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

India vs Bangladesh, Chennai Test : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट सध्या चेन्नईत सुरु आहे. या टेस्टमधील पहिल्या दोन दिवसांमध्येच दोन्ही टीमच्या एक-एक इनिंग संपल्या आहेत. टीम इंडियानं पहिल्यांदा बॅटिंग करताना आर. अश्विनच्या दमदार सेंच्युरीच्या जोरावर 376 रन केले. त्याला उत्तर देताना बांगलादेशची पहिली इनिंग फक्त 149 मध्येच संपुष्टात आली. 

चेन्नईचं एमए चिदंबरम स्टेडियम हे स्पिन बॉलिंगला मदत करणारे समजले जाते. पण या पिचवर फास्ट बॉलर्सना मदत मिळत आहे. पहिल्या दोन दिवसात दोन्ही टीमच्या मिळून 23 विकेट्स पडल्या आहेत. या 23 पैकी 19 विकेट्स फास्ट बॉलर्सनी घेतल्या आहेत. स्पिन बॉलिंगला मदत करणाऱ्या पिचवर फास्ट बॉलर्स इतके यशस्वी का होत आहेत? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील पहिली टेस्ट लाल मातीच्या पिचवर खेळली जात आहे. या पिचवर फास्ट बॉलिंगला मदत मिळते. या पिचवर पाणी कमी शोषलं जातं. त्यामुळे ते पिच लवकर कोरडं होतं. सुरुवातीचे दोन दिवस लाल मातीचं पिच फास्ट बॉलर्लना मदत करणारं आहे. त्यानंतर या पिचवर भेगा पडतात आणि पिचला तडे गेल्यानंतर स्पिनर्सना त्याचा फायदा मिळतो. याच कारणामुळे भारतानं या पिचवर 3 फास्ट बॉलर्स खेळवले. बांगलादेशच्या पहिल्या इनिंगमध्ये भारताची ही रणनिती यशस्वी ठरली. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीप या फास्ट बॉलर्सनी 10 पैकी 8 विकेट्स घेतल्या. 

Advertisement

( नक्की वाचा : चेन्नई टेस्टमध्ये विराटनं केली भर मैदानात चूक, फॅन्स ते रोहित शर्मा सर्वांनाच धक्का )

भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 50 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या. याचबरोबर बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 विकेट्सचा टप्पा देखील पूर्ण केला आहे. त्यानं 227 इनिंगमध्ये 400 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. बुमराहनं 37 टेस्टमध्ये 163, 89 वन-डे मध्ये 149 तर 70 T20 इंटरनॅशनल मॅचमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत. 

चेन्नई टेस्टमध्ये रेकॉर्ड्स

चेन्नई टेस्टमधील दुसऱ्या दिवशी 17 विकेट्स पडल्या. चेन्नई टेस्टमध्ये पहिल्यांदाच एका टेस्टमध्ये इतक्या विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी 1979 साली भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात 1979 साली झालेल्या टेस्टमधील तिसऱ्या दिवशी 15 विकेट्स पडल्या. तर 2021 साली भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या टेस्टच्या चौथ्या दिवशी 15 विकेट्स पडल्या होत्या. तर याच सीरिजमधील दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी 15 विकेट्स पडल्या होत्या.
 

Advertisement
Topics mentioned in this article