केएल राहुलला वर्ल्ड कपमध्ये संधी का नाही मिळाली?, अजित आगरकरने दिलं उत्तर

केएल राहुल हा विकेटकीपर आहे, तसेच वरच्या फळीत खेळणारा उत्तम खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा दावा टीममध्ये वरच्या फळीसाठी होता.

जाहिरात
Read Time: 2 mins

आगमी टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा मंगळवारी करण्यात आली आहे.  टीम सिलेक्शनबाबत संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच विकेटकीपर फलंदाज केएल राहुलला वर्ल्ड कप संघात स्थान का नाही मिळाल? याबाबत अनेकांकडून विचारणा होता आहे. यावर निवड समितीचा अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

केएल राहुल हा विकेटकीपर आहे, तसेच वरच्या फळीत खेळणारा उत्तम खेळाडू आहे. त्यामुळे त्याचा दावा टीममध्ये वरच्या फळीसाठी होता. मात्र सध्याच्या घडीला वरच्या फळीत खेळण्यासाठी रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली हे खेळाडू आहे. हेच कारण आहे की केएल राहुलला संघात स्थान मिळालं नाही. 

ओपनर म्हणून निवड समितीन रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांना संधी दिली आहे. तर विराट कोहली देखील ओपनर म्हणून पर्याय असू शकतो. तिन्ही खेळाळू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे केएल राहुलला संघात स्थान देणे कठीण होतं, असं अजित आगरकरने म्हटलं. 

मधल्या फळीत ऋषभ पंत आणि संजू सॅमसन फॉर्ममध्ये आहेत. येथेही संजू आणि ऋषभ हे दोघे राहुलपेक्षा सरस ठरले. राहुलची फॉर्म चांगला आहे, मात्र स्ट्राईक रेटची समस्या आहे, असंही अजित आगरकरने म्हटलं. 

Advertisement

सध्या सुरु असलेल्या आयपीएल सीजनमध्ये केएल राहुलने 10 सामन्यात 40.60 च्या सरासरीने 406 धावा केल्या आहेत. या 10 सामन्यात राहुलने 3 अर्धशतके ठोकली आहेत. राहुलची या सीजनमधील सर्वाधिक धावसंख्या 82 आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट 142.95 आहे. 

कधीपासून सुरु होईल टी-20 वर्ल्ड कप?

यंदाचा वर्ल्ड कप वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणार आहे. येत्या 1 जूनपासून ते 20 जूनपर्यंत हा टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. यावेळी वर्ल्ड कपमध्ये 20 टीम सहभागी होतील. या टीम 4 ग्रुपमध्ये विभागल्या जाणार आहेत. प्रत्येक ग्रुपमधील 2 अशा 8 टीम सुपर 8 मध्ये पोहोचतील. 

Advertisement

वर्ल्ड कप टीम ग्रुप 

ग्रुप ए - भारत, पाकिस्तान, आयर्लंड, यूएसए, कॅनडा.
ग्रुप बी - इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलँड, ओमान.
ग्रुप सी - न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी.
ग्रुप डी - साऊथ आफ्रीका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ. 
 

Topics mentioned in this article