PM मोदींच्या रोहित-द्रविडसह वर्ल्ड कप फोटोची का होतीय चर्चा? BJP ला इंदिरा गांधींची आठवण का आली?

PM Modi Meets Team India: स्पेशल चॅम्पियन जर्सी घातलेल्या खेळाडूंसह मोदींनी फोटो क्लिक केला. त्याचवेळी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या प्रसंगाची जोरदार चर्चा होत आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
P
मुंबई:

टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. त्यांना पंतप्रधान निवासस्थानी येण्याचं निमंत्रण दिलं. बार्बाडोसमधील वादळामुळे भारतीय टीमला मायदेशी येण्यासाठी 4 दिवस वाट पाहावी लागली. आता टीम इंडिया मायदेशी परतलीय. दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर टीमचं भव्य स्वागत झालं. त्यानंतर सर्व खेळाडूंनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. स्पेशल चॅम्पियन जर्सी घातलेल्या खेळाडूंसह मोदींनी फोटो क्लिक केला. त्याचवेळी कॅमेऱ्यामध्ये कैद झालेल्या एका प्रसंगामुळे सर्वजण मोदींची प्रशंसा करत आहे. सोशल मीडियावरही त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. 

विश्वकप ट्रॉफी मोदींनी का घेतली नाही?

टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबर फोटो सेशनच्या दरम्यान पंतप्रधान मोदींनी टी20 वर्ल्ड कप ट्रॉफी स्वत: घेतली नाही. त्यांनी ती ट्रॉफी टीमचा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविडकडं सोपवली. हा फोटो पाहून फॅन्स प्रभावित झाले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेकजण मोदींची प्रशंसा करत आहेत. 

भाजपाला इंदिरा गांधींची आठवण का आली?

पंतप्रधान मोदींचा फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपानं एक्सवर एक फोटो शेअर केला. त्या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं - फरक स्पष्ट आहे.

काय आहे कारण?

सोशल मीडियावर अनेक युझर्सनं लिहिलंय, 'पंतप्रधान मोदींनी खेळाडूंचा सन्मान केला आहे. हे त्यांचे कष्ट आणि सातत्याचं फळ आहे, हे त्यांनी दाखवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वविजेत्या भारतीय टीमचे कष्ट आणि आयसीसी ट्रॉफीचा मान यांचा आदर केला आहे. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी खेळाडू दिवस-रात्र कष्ट करतात. मोठा दबाव सहन करुन हे विजेतेपद पटकावतात. या ट्रॉफीवर त्यांचाच अधिकार असतो.'

Advertisement

बीसीसीआयनं टीम इंडियाला पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

( नक्की वाचा : वादळात अडकलेल्या टीम इंडियाला घेऊन एअर इंडियानं कसं केलं उड्डाण? Inside Story )