Agarkar on Sarfaraz Khan: काही वर्षांपूर्वी देशांतर्गत क्रिकेटमध्ये रन्सचे टॉवर उभा करून टीम इंडियामध्ये स्थान मिळवणाऱ्या मुंबईच्या सरफराज खानला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. सरफराज गेल्या काही महिन्यांपासून त्याची बॅटिंग आणि फिटनेसवर खूप मेहनत घेत होता. त्याने नुकतेच सुमारे दहा किलो वजनही कमी केले, परंतु त्यानंतरही इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या टीम इंडियामध्ये त्याची निवड करण्यात आलेली नाही. सरफराजची निवड न झाल्यानं त्याच्या फॅन्सना धक्का बसला आहे. तो शर्यतीत का मागे पडला, याची कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1. न्यूझीलंडविरुद्ध अपयश
गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्धच्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये पहिल्या इनिंगमध्ये शुन्यावर आऊट झाल्यानंतर त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये दमदार 150 रन्स केले होते. पण, त्यानंतर पुणे आणि मुंबई टेस्टच्या चार इनिंगमध्ये सरफराजनं अनुक्रमे 11,9,0 आणि 1 रन काढला. निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनीही पत्रकार परिषदेत या मुद्याकडं लक्ष वेधलं. आगरकर सरफराजबाबत बोलताना म्हणाला की, 'मला माहित आहे की न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये सरफराजने सेंच्युरी केले होती, पण त्यानंतर त्याच्या बॅटमधून रन्स निघाले नाहीत. कधीकधी असे निर्णय टीम मॅनेजमेंट घेते.'
( नक्की वाचा : India Test Squad for ENG Tour : इंग्लंड दौऱ्यासाठी शमीची निवड का झाली नाही? आगरकरनं सांगितलं कारण )
2. अनुभवी बॅटरचा शोध
विराट कोहली निवृत्त झाल्यानंतर टीम इंडियाला मिडल ऑर्डरमध्ये अनुभवी बॅटरची गरज आहे, हे स्पष्ट आहे. सरफराजने आतापर्यंत एकूण 6 टेस्ट मॅच खेळला आहे. तर, परदेशी भूमीवर त्याला अजून पदार्पण करायचे आहे. यामुळेच निवड समितीनं करुण नायरला पसंती दिली. नायरने गेल्या दोन सिझनमध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात आगरकरनं सांगितलं, 'विराटच्या निवृत्तीनंतर आम्हाला मधल्या फळीत अनुभवी बॅटरची गरज होती. एकासोबत अयोग्य असलेली गोष्ट दुसऱ्यासाठी योग्य असते. सध्या करुणने रन्सचा टॉवर उभारलाय. तसंच त्याला थोडा काऊंटी क्रिकेटचा अनुभवही आहे.'
( नक्की वाचा : रोहित आणि विराटनं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय कधी घेतला? BCCI नं सांगितलं रहस्य )
3. तीव्र स्पर्धा आणि ऑलराऊंडर
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरने सविस्तरपणे सांगितले की, 'भारतीय क्रिकेटमधील वाढलेल्या स्पर्धेमुळे निवड समितीने हा निर्णय घेतला आहे. आणि हे काही विशिष्ट खेळाडूंच्या विरोधात जाऊ शकते किंवा त्यांच्यासाठी अनुचित असू शकते. साई सुदर्शन आणि करुण नायर यांनी मागील देशांतर्गत हंगामात केलेल्या कामगिरीमुळे सरफराजसाठी अडचणी निर्माण झाल्या, यात शंका नाही. याव्यतिरिक्त, टीम मॅनेजमेंटचा भर हा स्पेशालिस्ट खेळाडूपेक्षा ऑलराऊंडरवर होता. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरच्या पुनरागमनामुळेही सरफराजचा मार्ग आणखी खडतर झाला.