Yashasvi Jaiswal : 'यशस्वी जैस्वाल ने अजिंक्य रहाणेच्या किटबॅग ला मारली लाथ...नेमका प्रकार काय?

Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वालनं मुंबई क्रिकेट टीम सोडण्याचं नवं कारण उघड झालं आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

टीम इंडियाचा ओपनर यशस्वी जैस्वालनं (Yashasvi Jaiswal ) अचानक मुंबई क्रिकेट टीम सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला. जैस्वालनं याबाबत मंगळवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) पत्र लिहिलं होतं. त्यानंतर MCA नं ती विनंती मान्य केली. त्यामुळे आता यशस्वी 2025-26 च्या देशांतर्गत सिझनमध्ये गोवाकडून क्रिकेट खेळणार आहे. या सिझनमध्ये यशस्वी गोव्याचा क्रिकेट टीमचा कॅप्टन असेल. अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता यशस्वी या भूमिकेला किती न्याय देणार हे अस्पष्ट आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

यशस्वीनं काय सांगितलं होतं कारण

यशस्वी जैस्वालनं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, 'हा माझ्यासाठी खूप कठीण निर्णय होता. आज मी जो काही आहे तो मुंबईमुळे आहे. या शहरानं मला घडवलंय. मी आयुष्यभर एमसीएचा ऋणी आहे.'

त्यानं पुढं सांगितलं की, 'गोव्यानं मला नवी संधी दिली. त्यानं मला नेतृत्त्व करण्याची भूमिका दिली आहे. भारताकडून चांगलं खेळणं हे माझं पहिलं लक्ष्य आहे. मी राष्ट्रीय टीममध्ये नसेल त्यावेळी गोव्याकडून खेळेल. त्यांना स्पर्धेत पुढं नेण्याचा प्रयत्न करेन.' 

( नक्की वाचा : Yashasvi Jaiswal : 'त्या' मॅचमध्ये ठिणगी पडली आणि यशस्वीनं मुंबईची साथ सोडली? उघड झालं कारण )
 

नवं कारण समोर

यशस्वीनं हे कारण दिलं असलं तरी 'इंडिया टुडे' नं दिलेल्या रिपोर्टमध्ये यशस्वीनं मुंबईची टीम सोडण्यामागे आणखी एक कारण असल्याचा दावा केला आहे. या रिपोर्टनुसार मुंबई क्रिकेटमध्ये सतत होणाऱ्या मुल्यमापनावर यशस्वी खुश नव्हता. 

Advertisement

या रिपोर्टनुसार टीम इंडियाचा खेळाडू आणि मुंबई क्रिकेट टीमचा कॅप्टन अजिंक्य रहाणे सोबत यशस्वीचे संबंध नीट नव्हते. 2022 साली झालेल्या फर्स्ट क्लास क्रिकेट मॅचमध्ये सातत्यानं स्लेजिंग केल्यामुळे अजिंक्यनं यशस्वीला मैदानातून बाहेर पाठवलं होतं. त्या प्रसंगापासून या दोघांमध्ये संबंध ताणले गेले.

( नक्की वाचा : RCB vs GT : गुजरातच्या विजयानंतर गिलचा विराटवर निशाणा ! 7 शब्दांची पोस्ट Viral )
 

त्या फर्स्ट क्लास मॅचमध्ये यशस्वीनं 323 बॉलमध्ये 265 रन्सची खेळी केली होती. त्यामध्ये 30 फोर आणि चार सिक्सचा समावेश होता. पण, मॅचच्या शेवटच्या दिवशी साऊथ झोनचा खेळाडू रवी तेजा विरोधात सातत्यानं स्लेजिंग करत असल्याबद्दल वेस्ट झोनचा कॅप्टन अजिंक्य रहाणेनं यशस्वीला मैदानाच्या बाहेर काढलं होतं. 

Advertisement

यशस्वीच्या शॉट सिलेक्शनवर मुंबई क्रिकेटमधून सातत्यानं प्रश्न विचारले जात होते, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मुंबई विरुद्ध जम्मू काश्मीर (Mumbai vs Jammu and Kashmir) यांच्यात मागील सिझनमध्ये झालेल्या मॅचमध्ये या विषयावर शेवटची काडी पडली. 

त्या मॅचमध्ये मुंबईचा कोच ओमकार साळवी आणि अजिंक्य रहाणे यांनी यशस्वीच्या कमिटमेंटबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. हा विषय इतका वाढला की संतापलेल्या यशस्वीनं मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणेच्या किटबॅगला लाथ मारली होती, अशी माहिती या घटनेशी संबंधित निकटवर्तीयांना दिल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. 

Advertisement

यापूर्वी पीटीआयच्या रिपोर्टमध्ये देखील मुंबईच्या वरिष्ठ खेळाडूंशी मतभेद झाल्यानंच यशस्वीनं मुंबई क्रिकेटची साथ सोडल्याचा निर्णय घेतला, असा दावा करण्यात आला होता. 
 

Topics mentioned in this article