Yograj Singh : माजी दिग्गज क्रिकेटर युवराज सिंग याचे वडील आणि अभिनेते योगराज सिंग यांनी नुकतच आपल्या आयुष्याबाबत माहिती दिली. यावेळी त्यांनी युवराजसोबत त्याच्या लहानपणी झालेल्या वादावर आपली भूमिका मांडली. आयुष्यातील सर्वात मोठ्या धक्क्याविषयीही त्यांनी यावेळी सांगितलं. विंटेज स्टुडिओला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग यांनी पहिली पत्नी शबनम कौर आणि मुलगा युवराज सोडून जाणं हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं. आता आयुष्यात कसलीच अपेक्षा राहिलेली नाही, त्यामुळे मृत्यूसाठी तयार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
ते आपल्या आयुष्याविषयी म्हणाले, चित्रपट आणि क्रिकेटसाठी बरेच धक्के खाल्ले, मात्र शेवटी आयुष्य जिथून सुरू केलं त्याच वळणावर येऊन ठेपलं आहे. ते आपल्या निर्णयाबाबत आनंदी आहे, मात्र आता त्यांना एकटेपणा जाणवत आहे.
देवा माझं काय चुकलं? - योगराज सिंग
पहिल्या पत्नीसोबतच्या नात्याबद्दल योगराज सिंग म्हणाले, युवी आणि त्याच्या आईने मला सोडून जाणं हा माझ्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. ज्या महिलेसाठी मी संपूर्ण आयुष्य घालवलं, ती मला सोडून निघून गेली. माझ्या आयुष्यातील अनेक गोष्टी उद्ध्वस्त झाल्या. मी देवाला विचारलं, की माझ्यासोबत असं का होतंय. मी सर्वांसाठी सर्व काही केलं. मी काही चूकही केल्यात. पण मी एक निरपराध माणूस आहे. मी कोणासोबतही वाईट केलं नाही.
नक्की वाचा - PM Modi Meets Team India : खट्याळ हरलीनचा पीएम मोदींना हटके प्रश्न अन् हॉलमध्ये एकच हशा पिकला, पाहा Video
भाग मिल्खा भागच्या अभिनेत्याने सांगितलं, मी मरणासाठी तयार आहे. माझं आयुष्य पूर्ण झालेलं आहे. देवाची इच्छा असेल तेव्हा तो मला बोलावून घेईल. सध्या मला जे काही मिळतंय त्यासाठी मी देवाचा आभारी आहे. यावेळी ते पुढे असंही म्हणाले, त्यांचा लहान मुलगाही अमेरिकेत निघून गेला. यावेळी ते म्हणाले, मी अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहे. घरात कोणी नसतं. अशा वेळी अनोळखी व्यक्ती मला जेवण देतात. मी एकटाच घरात बसून असतो.
योगराज सिंगने शबनम कौरसोबत लग्न केलं होतं. दाम्पत्याला युवराज सिंग नावाचा मुलगा आहे. योगराजने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर भाग मिल्खा भागमध्ये त्यांनी भारतीय कोच रणवीर सिंगची प्रमुख भूमिका साकारली आहे.