Solapur | सोलापुरात दीड वर्षाच्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू, नातेवाईकांचा डॉक्टरवर आरोप
18-month-old child dies during treatment in Solapur; relatives accuse doctor.
सोलापुरात सर्दीचा त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या दीड वर्षाच्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बालकाला उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. उपचारादरम्यान बालकाची प्रकृती खालावली आणि त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बालकाच्या मृत्यूचे नेमके कारण काय? उपचारात हलगर्जीपणा झाला का? याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. मृत्यूचे वैद्यकीय कारण आणि उपचारातील बाबी अधिकृत चौकशीनंतर स्पष्ट होतील.