लेकीच्या शिक्षणासाठी अख्खं गाव एकजुटीने उभं, मोलमजुरी करणाऱ्या कुटुबांतील लेकीचं स्वप्न होणार पूर्ण

लेकीच्या शिक्षणासाठी अख्खं गाव एकजुटीने उभं, मोलमजुरी करणाऱ्या कुटुबांतील लेकीचं स्वप्न होणार पूर्ण The entire village stands united for a girl's education; the dream of a girl from a family of daily-wage laborers is set to be realized. AR: मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालवणाऱ्या घरातील लेकीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होतंय. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अख्खं गाव तिच्या पाठीशी उभं राहिलंय. नांदेडच्या बारड गावातील काजल चव्हाणला एमबीबीएसला प्रवेश मिळाला. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. काजलची ही अडचण समोर येताच गावकऱ्यांनी लोकवर्गणी जमा केली आणि तिच्या पहिल्या वर्षाची संपूर्ण फी भरली. ही बातमी आमदार श्रीजया चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनीही मदतीचा हात पुढे केला. ‘तू फक्त शिक्षण घे, तुझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मी करते,’ असा शब्द त्यांनी काजलला दिलाय.एका लेकीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आणि तिच्यासाठी एकजुटीने उभं राहिलेलं संपूर्ण गाव पाहून माणुसकी अजूनही जिवंत असल्याची ही प्रेरणादायी कहाणी आहे.

संबंधित व्हिडीओ