मोठी बातमी, मुंबई मनपाच्या तिजोरीत खडखडाट, पर्यायी निधी उभारणीचा शोध सुरु | Mumbai BMC

मोठी बातमी, मुंबई मनपाच्या तिजोरीत खडखडाट, पर्यायी निधी उभारणीचा शोध सुरु | Mumbai BMC Big news: Mumbai Municipal Corporation's coffers are running dry; search for alternative funding sources is underway. मुंबई महापालिकेच्या मोठ्या पायाभूत प्रकल्पांचा खर्च वाढत असताना आता पालिका प्रशासनाने पर्यायी निधी उभारणीचे मार्ग शोधण्यास सुरुवात केली आहे. किनारी रस्ता, गोरेगाव-मुलुंड लिंक रोडचे जुळे बोगदे, सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे आधुनिकीकरण अशा प्रकल्पांमुळे महापालिकेवरील आर्थिक बांधिलकी दोन लाख कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. त्यामुळे कर्जासह विविध वित्तीय साधनांमधून निधी उभारण्यासाठी वित्तीय सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संस्था महापालिकेसाठी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्लॅन आणि डेट मॅनेजमेंट पॉलिसी तयार करणार आहे. तसंच म्युनिसिपल बाँड्स, ग्रीन बाँड्स, सस्टेनेबिलिटी बाँड्स, कार्बन क्रेडिट्स, केंद्र आणि राज्य शासनाची अनुदानं, कमी व्याजदराची विकास वित्त कर्जं अशा पर्यायांचा अभ्यास केला जाणार आहे. थोडक्यात, मुंबई महापालिकेच्या मोठ्या प्रकल्पांसाठी पैसा उभा करण्यासाठी आता पालिका पारंपरिक उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन नवे आर्थिक पर्याय शोधणार आहे.

संबंधित व्हिडीओ