Wardha News | वर्ध्यात डीजे मालक आणि गणेश मंडळावर कारवाई, कारण काय? | NDTV Marathi
Action taken against DJ owner and Ganesh Mandal in Wardha—what is the reason?
वर्ध्याच्या सिंदी रेल्वे येथे पारंपरिक तान्हा पोळा उत्साहात साजरा झाला; मात्र ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. उत्सवापूर्वी सर्व मंडळे आणि डीजे धारकांची बैठक घेऊन कर्णकर्कश आवाज टाळण्याच्या तसेच लेझर लाईटचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तरीही काही मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या डेसिबल मोजणीत आढळले. याप्रकरणी नऊ मंडळे आणि डीजे मालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
#wardhanews #WardhaGanpatiFestival #ndtvmarathi