अशोक खरातला मदत करणारे अधिकारी, तसचं त्याच्यासोबत आर्थिक व्यवहारात सहभागी असलेल्या आणि जमीन बळकावण्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची यादीच तयार करण्याचं काम सुरू झालंय. अशा अधिकाऱ्यांची नावं एसआयटीकडून महसूल विभागाकडे पाठवली जात आहेत, या प्रकरणाचा अंतिम अहवाल अद्याप येणं बाकी असला तरी अशा अधिकाऱ्यांचा सहभाग सिद्ध झाल्यास त्यांना, थेट बडतर्फ करण्यात येणार आहे असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलाय.