उल्हासनगर शहरात धक्कादायक प्रकार समोर आलाय.. 21 वर्षीय तरुणावर पाच जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडलीय.. या हल्ल्यात गणेश वाघे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.अंबरनाथच्या शिवमंदिर परिसरात राहणारा गणेश वाघे हा तरुण कॅम्प 5 मधील नेताजी चौक परिसरात गेला होता...अचानक पाच जणांनी त्याच्यावर हल्ला चढवत डोक्यावर जबर मारहाण केली. तसेच हल्लेखोरांनी चाकू पोटात घुसवला..दरम्यान, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे... तर आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येतीय...