महिनाभर पावसाची दडी, बुलढाण्यात हतबल शेतकऱ्याने दोन एकर सोयाबीनवर फिरवला रोटावेटर
After a month-long dry spell, a helpless farmer in Buldhana ran a rotavator over his two acres of soybean crops.
जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील शेतकरी मनीष वामन श्रीनाथ यांनी दोन एकर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली होती. पिकासाठी जवळपास एक लाख रुपयांचा खर्च झाला; मात्र महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने उभे सोयाबीन पीक करपून गेले. आता पाऊस झाला तरी उत्पादनाची अपेक्षा नसल्याने कापणी-मळणीचा खर्च करणेही परवडणार नसल्याने श्रीनाथ यांनी अखेर दोन एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवून पीक नष्ट केले. पावसाअभावी झालेल्या नुकसानीची शासनाने दखल घेऊन आर्थिक मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.