अकोला शहराला महान काटेपूर्णा प्रकल्पातून मुख्य पाणीपुरवठा गेल्या अनेक वर्षापासून होतो.मात्र, सध्या मोठ्या प्रमाणात उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाण्याचा साठा कमी होत आहे.दरम्यान महान काटेपूर्णा धरणात आज 20 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.जर पावसाळा लांबणीवर पडला. तर अकोल्याच्या नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.. या दरम्यान, कुठेही पाण्याचा अपव्यय होत असेल, तर संबंधित जलसंपदा विभाग आणि महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना याबाबत संपर्क करावा. असं आवाहन जलसंपदा विभाग कडून करण्यात आलंय.याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट यांनी.