केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज नागपूर दौऱ्यावर आहेत. रात्री 8.30 वाजता ते नागपुरात येणार आहेत. हॉटेल प्राईड समोर डॉ हेडगेवार चौकात त्यांचं स्वागत होईल.ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात मोठं यश मिळाल्यानंतर गृहमंत्री पहिल्यांदाच नागपुरात येणार आहेत.त्यामुळे भाजपकडून जंगी तयारी सुरू आहे.