अमरावती शहरात झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने जिल्हातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयातील व्यवस्थेची पोलखोल केली आहे.जिल्हा सामान्य रुग्णालय जलमय झालं असून, अतिदक्षता वॉर्डातही पाणी शिरल्याने रुग्णांच्या उपचार व्यवस्थेवर परिणाम झाला आहे.रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली असून,साचलेलं पाणी काढण्यासाठी वायपर आणि मशीनचा वापर करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.इतकंच नाही तर सिटी स्कॅन आणि सोनोग्राफी कक्षातही पाणी साचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.दरवेळी पावसात वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येमुळे परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे.