ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्याने भारतातील 15 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.. त्यामुळे भारतीय वायूदलाने ड्रोनचा वापर करुन लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त केल्याची माहिती समोर आलीय.. पाकिस्तान भारतावर मोठा हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता.हा हल्ला उधळून लावण्यासाठी भारताने ड्रोन हल्ला करुन पाकिस्तानची HQ-9 रडार यंत्रणा उद्ध्वस्त केली, अशी माहिती भारतीय लष्कराकडून देण्यात आली. भारतीय हवाई दलाच्या एस-400 सुदर्शनचक्र हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीने भारताच्या दिशेने येणाऱ्या लक्ष्यांवर हल्ला केला.. ANI या वृत्तसंस्थेने ही माहिती दिली.. मात्र याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाहीय.पाकिस्तानने 7 आणि 8 मे च्या रात्री अमृतसर, अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भुज, आदमपूर, भटिंडा, लुधियानासह इतर शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.. मात्र, भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला.. दरम्यान, HQ-9 ही चायना प्रेसिजन मशिनरी इम्पोर्ट-एक्सपोर्ट कॉर्पोरेशननं विकसित केलेली एक पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली आहे.. ही क्षेपणास्त्र प्रणाली चीनच्या लष्करी तंत्रज्ञानाचं एक उत्तम उदाहरण मानली जाते आणि 2021 मध्ये पाकिस्ताननं ताफ्यात तिचा समावेश केला होता..