ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर केंद्र सरकारने आज सकाळी संसदेत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेली या बैठकीला गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.