गेल्या काही दिवसांपासून दिशा सालियान मृत्यू, नागपूर येथे झालेली दंगल यासारख्या विषयांवरुन राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. नागपूरमधील हिंसाचाराप्रकरणी विरोधकांनी कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांच्या प्रक्षोभक विधानांना जबाबदार धरलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे पत्रकार परिषद घेत मोठे गौप्यस्फोट केले आहेत.